ताज्या घडामोडी :
Home » » पानटपरीधारकांवर अन्याय करू नये....................

पानटपरीधारकांवर अन्याय करू नये....................

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, २९ ऑगस्ट, २०१३ | गुरुवार, ऑगस्ट २९, २०१३

येवला -   सुगंधी तंबाखू व सुपारी वरील बंदी उठवून   सर्व पान
टपरीधारकांना काही अटी, शर्ती लावून तंबाखू विक्रीस परवानगी द्यावी, अशी
मागणी शहरातील पान टपरीचालकांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली
आहे. शासनाने एक वर्षापूर्वी गुटखा बंदी लागू केली. त्यानंतर आता
तंबाखूवर बंदी आणली आहे. शासनाने इतर अमली पदार्थांवर दुर्लक्ष करून
आमच्यासारख्या सामान्य पानटपरीधारकांवर अन्याय करू नये, पानटपरीवर नेमका
कोणता माल विक्रीस ठेवावा, या विवंचनेत आम्ही असून आम्हास न्याय मिळावा,
असे निवेदनात म्हटले आहे. त्यावर अनिल ताठे, र्जरार पहिलवान, दर्शन पान,
विजय सोनवणे, जाकीर अन्सारी, भगवान रोठे, सतिश कायस्थ, दिलीप शिडे, मनोज
गुडेकर, आनंद नियाती आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity