ताज्या घडामोडी :

.

.
Home » » येवला नगराध्यक्ष बॅडमींटन स्पर्धा उत्साहात पार.........

येवला नगराध्यक्ष बॅडमींटन स्पर्धा उत्साहात पार.........

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, १९ नोव्हेंबर, २०१३ | मंगळवार, नोव्हेंबर १९, २०१३

येवला- -येवला नगराध्यक्ष निलेश पटेल यांच्या सहकार्याने नवचैतन्य क्रिडा
मंडळ आयोजीत नाशिक जिल्हास्तरीय नगराध्यक्ष चषक बॅडमिंटन स्पर्धा तालुका
क्रिडा संकुलात संपन्न झाल्या. या स्पर्धेत
येवला,मालेगाव,लासलगांव,मनमाड,नांदगाव , सिन्नर येथील एकुण १२८
स्पर्धकांनी सहभाग नोंदवला. सदर स्पर्धेत मालेगाव व येवला येथील
खेळाडूंनी विजेते व उपविजेतपद मिळवले.. यशस्वी खेळाडूंना नगराध्यक्ष
निलेश पटेल यांच्या हस्ते ट्रॉफी,टी-शर्ट,व रोख बक्षिस देऊन गौरवण्यात
आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नाशिक जिल्हा बॅडमिंटन असो. चे
अध्यक्ष एस.राजन होते.बक्षीस वितरण कार्यक्रमासाठी शिरीष
नांडुर्डीकर,सुनिल शिंदे,यती गुजराथी,संजय पवार,अनंत जोशी,सुनिल
पहुजा,महेंद्र शेलार आदी उपस्थीत होते.सुत्रसंचालन हेमंत धांडे व नंदू
गायकवाड यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी क्रिडाशिक्षक किरण कुलकर्णी,
मंदार खैरे,सुमित गायकवाड, सनी शिंदेपाटील, स्वप्नील बाकळे, मोईन
दिलावर,तेजस क्षत्रिय आदी प्रयत्नशील होते.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity