ताज्या घडामोडी :

.

.
Home » » ५ वीच्या विद्यार्थींनीशी अश्लिल चाळे करणारा शिक्षक गजाआड.......

५ वीच्या विद्यार्थींनीशी अश्लिल चाळे करणारा शिक्षक गजाआड.......

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, २५ नोव्हेंबर, २०१३ | सोमवार, नोव्हेंबर २५, २०१३

येवला - (अविनाश पाटील) गुरु शिष्य पंरपरा श्रेष्ठ माननाऱ्या समाजामध्ये
काही विकृत या गुरुपदला काळीमा फासत असतात . अशीच घटना येवला तालुक्यातीलविखरणी येथील बिजलाईनगर येथे जि.प च्या वस्ती शाळेमध्ये घडली आहे. आपल्या
विद्यार्थींनीशी अश्लिल चाळे करणाऱ्या शिक्षकामुळे पालकामध्ये घबराट
उडाली आहे.
येथील शिक्षक सुभाष सबाजी शेजवळ वय- ५५ याने इयत्ता ५ वीच्या वर्गात शिकणाऱ्या
मुलींशी अश्लील चाळे केले. हा प्रकार गेले दोन महिन्यापासून चालू होता.
एका मुलीने आपल्या पालकांना याबाबत सांगितल्याने हा प्रकार उजेडात आला.
तुम्हाला नापास करेन, तुम्ही १० वी १२ वी ला गेल्यावर हेच करावे लागेल
तेव्हा तुम्हाला त्रास होणार नाही असे सांगून त्याने हा प्रकार केला
कोणालाही सांगू नका ही शपथ व धाकटपाशा घालून तो मधल्या सुट्टीत व शाळा
सुटल्यावर हा प्रकार करीत असे. याबाबत पालकाच्या फिर्यादीवरून येवला
तालुका पोलिस ठाण्यात विनयभंगाचा भा.दं.वि ३५४ अ (१) (I) (V) व ५०६
अन्वये आणि बाल लैगिंक शोषण प्रतिबंधक कायदा २०१२ च्या कलम ८, १०, १२
अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी शिक्षकास अटक करण्यात आली आहे.
याबाबत अधिक तपास पो.नि सुरेंद्र शिरसाठ यांचे मार्गदर्शनाखाली पो.उ.नि
विजय पाटील करीत आहे.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity