ताज्या घडामोडी :

.

.
Home » » निलांबरी रो हाऊस मधील महिला नागरी सुविधासाठी आक्रमक...............

निलांबरी रो हाऊस मधील महिला नागरी सुविधासाठी आक्रमक...............

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, २८ नोव्हेंबर, २०१३ | गुरुवार, नोव्हेंबर २८, २०१३

येवला - निलांबरी कॉलनीमधील महिलांनी नागरी सुविधेसाठी बेमुदत उपोषणाचा
इशारा येवला नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे. दोन
महिन्यांपुर्वी याच महिलांनी याबाबत मोर्चा काढला होता. तेव्हा दोन दिवस
साफसफाई करुन पुन्हा तिकडे कोणीच फिरकले नाही त्यामुळे त्यांना हा मार्ग
अवलंबवला लागला. या वसाहतीमध्ये सांडपाणी वाहून नेण्याची व्यवस्था
नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे.पथदिवे नाहीत तसेच शहरात
गल्लोगल्ली पेव्हर ब्लॉक बसवलेले असताना नववसाहतीमध्ये ते बसवावेत अशी
मागणी त्यांनी केली आहे. शहरातील नागरी सुविधा नववसाहतीमध्ये मिळण्यासाठी
नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे. नगरपालिका घरपट्टी सक्तीने वसूल करते
पण नागरी सुविधा काही पुरवत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.सर्वाधिक महसूल
नगरपालिकेला नववसाहतीमध्ये मिळतो पण मुलभूत सेवा पुरवण्यास नगरपालिका
प्रशासन कमी पडत आहे. निवेदनावर मनिषा आहेर, स्मिता जाधव,लिलावती सोनवणे,
उषा दिवटे,योगिता धनवटे, प्रिया थोरे, विद्या थोरात आदिसह रहिवाशी
महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity