ताज्या घडामोडी :

.

.
Home » » येवला तालुका पशु चिकित्सालयाचा अनोगोंदी कारभाराचा झाला कळस

येवला तालुका पशु चिकित्सालयाचा अनोगोंदी कारभाराचा झाला कळस

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, ३ नोव्हेंबर, २०१३ | रविवार, नोव्हेंबर ०३, २०१३

येवला - येवला तालुका पशु चिकित्सालयाचा अनोगोंदी
कारभाराचा आता कळस होत चालला आहे. सकाळी ८ ला उघडणारे चिकित्सालयात ११.३०
पर्यंत सुध्दा पशुधन पर्यवेक्षक हजर राहत नसल्याने पशुपालकांना अनंत
अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. शहरापासून दूर असल्याने रिक्षाने कुत्रे
,बकरी,मेंढी सारखे पशुरुग्ण पर्यवेक्षकाची वाट पाहत असतात. शनिवारी सकाळी
१०.३० ला मनसेचे शहराध्यक्ष गौरव कांबळे व मनविसे चे सागर बाबर आपल्या
कुत्र्याला चिकित्यालयात दाखविण्यासाठी आले असताना त्यांनी सदरचा प्रकार
अनुभवला. तेथील सर्व दालने उघडे असून तेथे कोणाचाही पत्ता नव्हता. लाखोची
मशिनरी असलेला सुसज्ज दवाखाना सताड उघडा ठेऊन कर्मचारी कोठेतरी निघुन
गेलेले होते. तेथे सहायक पशु आयुक्त दर्जाचा अधिकारी असूनही ते सुध्दा
तेथे उपस्थित नव्हते. सदरच्या प्रकाराचे चित्रीकरण मनसेचे कांबळे यांनी
आपल्या मोबाईल मध्ये केले .तेथे मनविसेचे जिल्हाउपाध्यक्ष विजय निकम,
चेतन फुलारी, सरचिटणिस रितेश बूब यांच्या सह मनसेचे कार्यकर्ते गोळा झाले
त्याची खबर लागल्याने राजकारणात मशगुल असलेले पशुधन पर्यवेक्षक सतिश
कुऱ्हे हे ११.२५ च्या दरम्यान उपस्थित झाले . गौरव कांबळे यांनी विचारणा
केली असता त्यांनी व्हिजीटला गेलो असे उडवाउडवीची उत्तरे
दिली.चिकित्सालयामध्ये आतमध्ये मोटारसायकल लावलेली होती.
दैनिक भास्कर मध्ये यापुर्वी या चिकित्सालयात कमी कर्मचारी असल्याचे व
प्रशिक्षित पशुचिकित्सक नसल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते.अजुनसुध्दा या
चिकित्सालयात पदवीधर पशुचिकित्सक नेमण्यात आलेला नसून पर्यवेक्षकच
चिकित्सकाची भुमिका पार पाडत आहे. स्वतःची व पत्नीची राजकिय कारकिर्द
घडविण्यात पर्यवेक्षक सतिश कुऱ्हे व्यस्त असल्याने त्यांचे लक्ष
चिकित्सालयात कमी व राजकारणात जास्त दिसून येत आहे. या चिकित्सालयात औषधे
सुध्दा उपलब्ध नसतात. पशुपालकांना स्वखर्चाने बाहेरून औषधे आणावी लागत
असल्याने त्यांचातही नाराजी वाढत आहे. मागील आठवड्यात येथे उपचाराला
आलेली गाय उपचाराअभावी मृत्यूमुखी पडल्याचीही कुजबुज ऐकू येत आहे.
तक्रारीचा फायदा होत नसल्याने पशूपालक सहन करण्याची भुमिका ठेवत आहे.
पुढाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने कर्मचाऱ्यांचेही फावलेले आहे.
यापुर्वी येथे चोरी झालेली असताना देखील सताड उघडे चिकित्सालय ठेवणाऱ्या
कर्मचाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी मनसेचे गौरव कांबळे यांनी केलेली
आहे.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity