येवला - विंचूरनजीक आज दुपारी ४ वाजेच्या सुमारास झालेल्या विचित्र
अपघातात औरंगाबाद जिल्ह्यातील दोनजण जागीच ठार झाले. नाशिक येथे दशक्रिया
विधीचा कार्यक्रम आटोपून औरंगाबादकडे परतणार्या इको स्पोर्ट फोर्ड कार व
ट्रक यांच्यात हा अपघात झाला.
राहुल गणपत वाल्हेकर (३५) औरंगाबाद), सुमनबाई भिकनराव खरे (६५) रा.
भोकनगाव, ता. कन्नड) अशी मृतांची नावे आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील पाच जण
नाशिक येथील आपल्या नातेवाईकांकडील दशक्रिया विधीचा कार्यक्रम आटोपून इको
स्पोर्ट फोर्ड (एमएच २0 सीयू २१) या गाडीने औरंगाबादकडे परतत होते. भरवस
फाट्याकडील लोळगे वस्तीनजीक कारचालकाचा ताबा सुटल्याने फोर्ड गाडी
दुभाजकावरून पलीकडे जाऊन औरंगाबादकडून येणार्या मालवाहतूक ट्रकवर (क्र.
डब्लूबी २३ सी ५४६१) आदळल्याने फोर्ड गाडीचा जागीच चक्काचूर होऊन गाडीतील
दोघे जागीच ठार झाले. नागरिकांनी फोर्ड गाडीच्या दरवाजाचे पत्रे तोडून
गाडीमधील लोकांना बाहेर काढले.
Home »
» औरंगाबाद जिल्ह्यातील दोनजण विंचूरजवळ अपघातात जागीच ठार