ताज्या घडामोडी :

.

.
Home » » रेंडाळे येथे शिक्षक नेमणुकीसाठी अधिकाऱ्यांना तोंडाला काळे फासण्याचा छावाचा इशारा

रेंडाळे येथे शिक्षक नेमणुकीसाठी अधिकाऱ्यांना तोंडाला काळे फासण्याचा छावाचा इशारा

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, १८ डिसेंबर, २०१३ | बुधवार, डिसेंबर १८, २०१३

येवला - शिक्षण हक्काचा गाजावाजा राज्यासह देशात सगळीकडे होत असताना
विकसनशील येवला तालुका त्याबाबत मागेच राहीला आहे. तालुक्यातील रेंडाळे
येथील ग्रामस्थांना प्रत्येक विद्यार्थ्याकडून १०० रुपये मासिक वर्गणी
गोळा करून खाजगी शिक्षकाच्या साह्याने आपल्या पाल्यांना शिक्षण देण्याची
वेळ जि.प व राज्य शासनाच्या अकार्यक्षमतेमुळे आली आहे. या बाबत येत्या १५
दिवसात शिक्षकांची नेमणुक न झाल्यास अधिकाऱ्यांना तोंडाला काळे फासण्याचा
इशारा छावा संघटनेचे येवला तालुकाध्यक्ष दिपक देशमुख व उपजिल्हाध्यक्ष
नवनाथ आहेर यांनी पंचायत समितीमध्ये गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या
निवेदनात दिला आहे. यावेळी गटशिक्षणाधिकारी उपस्थित नसल्याने त्यांच्या
खुर्चीला निवेदन चिटकविण्यात आले. कार्यालयातील इतर अधिकाऱ्यांनी निवेदन
स्विकार करण्यास नकार दिला असे छावा च्या पदाधिकाऱ्यांनी सांगीतले.
रेंडाळे गावामध्ये जि.प ची इ.१ ली ते ६ वी पर्यंतची शाळा असून १५३
विद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहे. सध्या तेथे तीन शिक्षकांची कमतरता असून
वेळोवेळी मागणी करुनही पुर्तता होत नसल्याने ग्रामस्थांनी प्रति
विद्यार्थी १०० रु वर्गणी काढुन तीन शिक्षक नेमलेले आहे. एकीकडे मोफत
शिक्षणांचा गाजावाजा चालू असताना या दुष्काळी गावातील ग्रामस्थांना
शिक्षणासाठी पदरमोड करुन खर्च करावा लागत आहे. पालकमंत्र्याचा मतदारसंघ
विकासासाठी राज्यात प्रसिध्द केला जात आहे पण वास्तवात किरकोळ
मागण्यासाठी आंदोलने करण्याची वेळ जनतेवर येत आहे.निवेदनावर दिपक
देशमुख, नवनाथ आहेर,संतोष गुंजाळ,अमोल फरताळे,दत्ता चव्हाण,अरुण
जानराव,सुनिल हिरे आदीसह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
याबाबत सभापती शिवांगी पवार यांच्याशी दै.भास्कर प्रतिनिधीने संपर्क
साधला असता त्यांनी अतिरिक्त शिक्षक त्या शाळेवर नेमण्यात होणार होते पण
नाशिक येथे होणारी बैठक लांबलेली असल्याने लवकरच होणाऱ्या बैठकीमध्ये हा
निर्णय होईल . सध्या तालुक्यात २८ शिक्षक अतिरिक्त असून आर.टी.ई च्या
नियमाने ते ४५ होण्याची शक्यता आहे. तेव्हा रेंडाळे येथील शाळेवर शिक्षक
नेमणुक होईल असेही त्यांनी सांगीतले. गटशिक्षणाधिकारी किसन चौधरी यांनी
सांगीतले कि शिक्षकाबाबतची माहिती जि.प कडे पाठण्याची प्रक्रिया चालू आहे
लवकरच तेथे शिक्षक नेमण्यात येणार आहे.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity