ताज्या घडामोडी :
Home » » अस्थिरोग व स्त्रीरोग तज्ज्ञांची नेमणूक करा ग्रामीण रुग्णालयातील समस्या; सेनेचे उपोषण

अस्थिरोग व स्त्रीरोग तज्ज्ञांची नेमणूक करा ग्रामीण रुग्णालयातील समस्या; सेनेचे उपोषण

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, ४ डिसेंबर, २०१३ | बुधवार, डिसेंबर ०४, २०१३

येवला -शहरातील ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोग, भूल व अस्थिरोग तज्ज्ञांची
नेमणूक 15 दिवसांत शासनाने न केल्यास ग्रामीण रुग्णालयास कुलूप ठोकण्याचा
इशारा शिवसेनेचे ग्रामीण जिल्हाप्रमुख कारभारी आहेर यांनी दिला.
शिवसेनेच्या वतीने मंगळवारी येथील ग्रामीण रुग्णालयासमोर विविध
समस्यांप्रश्नी उपोषण करण्यात आले. वैद्यकीय अधीक्षकांच्या लेखी
आश्वासनानंतर लाक्षणिक उपोषण स्थगित करण्यात आले.
उपोषणात शिवसेना ग्रामीण जिल्हाप्रमुख कारभारी आहेर, कल्याणराव पाटील,
रूपेश लोणारी, सर्जेराव सावंत, संजय सोमासे, धीरज परदेशी आदी सहभागी झाले
होते.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity