ताज्या घडामोडी :
Home » » छावा संघटनेचा मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

छावा संघटनेचा मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, २८ डिसेंबर, २०१३ | शनिवार, डिसेंबर २८, २०१३

येवला - मराठा समाजाचा इतर मागासवर्ग प्रवर्गात समावेश करून आरक्षणाची र्मयादा वाढवावी, यासाठी शुक्रवारी छावा मराठा संघटनेने प्रदेशाध्यक्ष
विलास पांगारकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको केला. शहरातील नगर-मनमाड राज्य महामार्गावर विंचूर चौफुलीवर शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता रास्ता रोकोला सुरुवात झाली. रास्ता रोकोत प्रदेश उपाध्यक्ष योगेश केवारे, प्रवक्ता सुभाष जावळे, प्रदेश कार्याध्यक्ष तानाजी हुसेकर, जिल्हाध्यक्ष संजय जाधव, उत्तर महाराष्ट्र प्रमुख सुनील गुंजाळ आदी सहभागी झाले होते. 'कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही', 'मराठा समाजाला
आरक्षण मिळालेच पाहिजे', 'जय भवानी, जय शिवाजी' आदी घोषणा देत छावाच्या कार्यकर्त्यांनी लक्ष वेधले होते. निवासी नायब तहसीलदार विनायक थविल यांना छावा संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
Share this article :
मित्रानो ….
गेले सहा वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity