ताज्या घडामोडी :

.

.
Home » » 'सोशल हार्टबीट' ने केली अनकाई किल्ल्यांची साफसफाई

'सोशल हार्टबीट' ने केली अनकाई किल्ल्यांची साफसफाई

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, २९ डिसेंबर, २०१३ | रविवार, डिसेंबर २९, २०१३

येवला - पुणे मुंबई सारख्या ठिकाणी असलेले दुर्गप्रेमी आपण पाहीले असतील पण आता येवला तालुक्यासारख्या ठिकाणी दुर्गप्रेमी तयार झाले असून
तालुक्यातील 'सोशल हार्टबीट' या सामाजिक उपक्रम राबविणार्‍या महाविद्यालयीन तरुणांच्या समूहाने ऐतिहासिक पर्यटन स्थळ असलेल्या अनकाई
किल्ल्याची साफसफाई करीत आजच्या महाविद्यालयीन तरुणांसमोर एक आदर्श उभा
केला आहे. वर्षभरात जिल्ह्यातील किल्ल्यांची साफसफाई करण्याचा ध्यासही या तरुणांनी व्यक्त केला आहे.  या मोहिमेत 40 महाविद्यालयीन तरुण-तरुणी सहभागी झाले होते. शुक्रवारीसकाळी तरुणांचा ग्रुप अनकाई किल्ल्यावर दाखल झाला. त्यांनी किल्ल्याची
झालेली पडझड, मंदिराची झालेली दुरवस्था, पर्यटकांनी टाकलेला अस्ताव्यस्त
कचरा, प्रेमी युगुलांनी दगडांवर रंगांनी लिहिलेली नावे हे बघून तरुणांनी
दुर्ग संवर्धन मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर लगेचच या
तरुणांनी साफसफाईला सुरुवात केली. किल्ल्यावरील कचरा गोळा करीत दगडांवर
प्रेमी युगुलांनी लिहिलेली नावे साफ केली. दिवसभर सपूर्ण किल्ल्याची
साफसफाई करीत 50 किलो कचरा किल्ल्याच्या पायथ्याशी आणत नष्ट केला.

या दुर्ग संवर्धन मोहिमेत सोशल हार्टबीट या सामाजिक संस्थेचे शैलेश
घाडगे, धीरज महाजन, नितीन मढे, चैतन्य कल्याणकर, अक्षय नागपुरे, मयूर
भदाणे, वैभव भदाणे, मयूर वाडेकर, सोनाली देवरे, पूनम दातरंगे, ज्ञानेश्वर
भगुरे आदी महाविद्यालयातील तरुण, तरुणी सहभागी झाले होते. अनकाई
किल्ल्यावरील मोहीम यशस्वीतेसाठी संदीप जठार, राकेश धांडगे, मोहिनी
गायकवाड, प्रतीक्षा शिंदे यांनी पर्शिम घेतले.

सोशल हार्टबीट या सामाजिक संस्थेचा दुर्ग संवर्धन मोहिमेचा हा पहिलाच
उपक्रम आहे. पुढील वर्षात जिल्ह्यातील सहा किल्ल्यांवर साफसफाई मोहीम
राबविण्यात येणार आहे, असे संस्थेतील सहभागी तरुणांनी सांगितले. 'सोशल
हार्टबीट' संस्थापक अध्यक्ष, भूषण लाघवे म्हणाले कि ऐतिहासिक
किल्ल्यांचे जतन करून वैभव टिकवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. पर्यटक
वैभव बघायला येतात, सहलीचेही आयोजन करतात. मात्र, किल्ल्यावर घाण टाकली
जात असल्याने त्याचे वैभव लयास जात आहे. यामुळे किल्ल्यांचे जतन
करण्यासाठी दुर्ग संवर्धन मोहीम हाती घेऊन 'सोशल हार्टबीट' यापुढे
प्रयत्नशील राहणार आहे.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity