ताज्या घडामोडी :

.

.
Home » » अपंग सप्ताहाची पंचायत समितीमध्ये सांगता.....

अपंग सप्ताहाची पंचायत समितीमध्ये सांगता.....

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, ९ डिसेंबर, २०१३ | सोमवार, डिसेंबर ०९, २०१३

येवला - गेल्या सप्ताहभर चाललेल्या अपंग सप्ताहाची सांगता आज पंचायत
समितीसभापती शिवांगी पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आली. अपंग कायदा
१९९५ नुसार व शिक्षण अधिकार अधिनियम २००९ अन्वये समान संधी, हक्काचे
संरक्षण व ,संपुर्ण सहभाग या कायद्यानुसार विशेष गरजा असणाऱ्या
विद्यार्थांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी या सप्ताहाचे
आयोजन ३ डिसेंबर ते ९ डिसेंबर पर्यंत करण्यात आले होते. या
कार्यक्रमांतर्गत शाळास्तरावर प्रभात फेरी काढण, पालक प्रशिक्षण घेणे,
लोकप्रतिनिधी व स्वयंसेवी संस्था राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान समन्वय
व कर्मचारी यांना समाविष्ट करुन जाणीव जागृतीपर प्रभात फेरी व
कार्यशाळेचे आयोजन करणे इ कार्यक्रम राबविण्यात आले. आज सकाळी १० वाजता
पंचायत समिती कार्यालयासमोर सभापती शिवांगी पवार उपसभापती जयंत वाघ, पंस
सदस्य हरीभाऊ जगताप, , पंस सदस्य पोपट आव्हाड यांच्यासह गटविकास अधिकारी
अजय जोशी यांच्या उपस्थितीत अपंग सप्ताह अंतर्गत काढण्यात येणाऱ्या
प्रभातफेरीचे व चित्ररथाचे उद्घाटन करण्यात आले. एन्झोकेम हायस्कुल च्या
विद्यार्थी व शिक्षकासमवेत शहरात प्रभात फेरी काढण्यात आली. कार्यक्रम
यशस्वितेसाठी विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर सपकाळे, बाळु पवार, श्रीमती
पी.जी.शेंडगे, यांचेसह सर्वशिक्षा अभियानचे कर्मचारी उपस्थित होते.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity