ताज्या घडामोडी :

.

.
Home » » बेटी वाचवण्यासाठी रॅलीला उदंड प्रतिसाद..........

बेटी वाचवण्यासाठी रॅलीला उदंड प्रतिसाद..........

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, १४ डिसेंबर, २०१३ | शनिवार, डिसेंबर १४, २०१३

येवला - स्त्री भ्रूण हत्येविरुद्ध जनजागृती करण्यासाठी विद्या एज्युकेशन
सोसायटी तर्फे करण्यात रन फॉर गर्ल चाईल्ड रॅलीला शहरातून उत्स्फुर्त
प्रतिसाद मिळाला.
टिळक मैदातून निघालेली रॅली शहराच्या मुख्य भागात फिरुन पुन्हा टिळक
मैदानात समारोप झाला.
विद्यार्थीनीनी विविध बॅनर्स , पोस्टर्स हातात घेऊन रॅलीत सहभाग नोंदवला.
अभियानाला पाठिंबा दिला . ' मुलगी वाचवा समाजाचा समतोल राखा ' अशा आशयाचे
फलक घेऊन सांताक्रुझमध्ये रिक्षा , दुकानांना स्टीकर्स लावण्यात आले .
टोप्या व पत्रके वाटण्यात आली . मुलींच्या बाबतीत आपला देश आजही
मागासलेलाच आहे. आपल्या देशातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर स्त्रीभु्रण
हत्येसाठी केला जातो हे आपलं खूप मोठ दुर्देव आहे. भारतात सर्वोच्च
राष्ट्रपतीपद भुषवणार्‍या प्रतिभाताई पाटील या एक स्त्रीच आहेत.कल्पना
चावला, मल्लेश्‍वरी,लता मंगेशकर, किरण बेदी, झाशीची राणी या सर्व
महिलांनी आपल्या कर्तृत्वाने वेगवेगळया क्षेत्रात यशाची शिखरे गाठली
आहेत. भारत मातेच्या या देशात मुलांना आदर्श मानून मुलींचा तिरस्कार केला
जातो. त्यामुळे मुला-मुलींच्या शिक्षणामधे विषमता दिसून येते. असे मत
रॅलीतील अनेक मान्यवरांनी व्यक्त केले. रॅलीमध्ये विविध वेषभुषा करुन
विद्यार्थीनी व मुली सामील झालेल्या होत्या.यावेळी पथनाट्य व नाटिका सादर
करण्यात आल्या.
नाशिकचे प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, अँथलिट
चॅम्पियन अंजना ठमके, संजीवनी जाधव, नगर येथील चळवळीच्या प्रमुख डॉ. सुधा
कांकरिया, एड.माणिकराव शिंदे, नरेंद्र दराडे, संभाजी पवार,दिनेश आव्हाड,
अरुण काळे, संतोष विंचू, राकेश गिरासे,सुनिल गायकवाड,सुनिल शिंदे,रविराज
पवार, प्रदिप सोनवणे,डॉ.किरण पहिलवान,धिरज परदेशी,धनंजय कुलकर्णी आदींसह
अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला. रॅलीच्या यशस्वीते साठी प्राचार्य महेश
अय्यर, डॉ.राजेश पटेल,डॉ.संगिता पटेल यांनी विशेष परिश्रम घेतले
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity