ताज्या घडामोडी :

.

.
Home » » दिल्ली मुंबईच्या तोडीचे शिक्षण ग्रामीण भागात नावारूपाला यावे केंद्रीय आरोग्य मंत्री श्रीमती संतोष चौधरी यांची जगदंबा संस्थेला भेट

दिल्ली मुंबईच्या तोडीचे शिक्षण ग्रामीण भागात नावारूपाला यावे केंद्रीय आरोग्य मंत्री श्रीमती संतोष चौधरी यांची जगदंबा संस्थेला भेट

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, ९ डिसेंबर, २०१३ | सोमवार, डिसेंबर ०९, २०१३

येवला : देशाचा विकास हा शिक्षनाच्या प्रगतीवर सुरु आहे.त्यामुळे सक्षम
विकासाठी दिल्ली मुंबईत असलेली शैक्षणिक सुविधा ग्रामीण युवकांसाठी
ग्रामीण भागातही सुरु होणे भविष्याचा विचार करता गरजेची बनली आहे.अशा
शैक्षणिक संस्था नावारूपाला आल्यास शिक्षण तळागाळातील घटकांपर्यंत
पोहचेल.येथील जगदंबा शिक्षण संस्थेने केलेली प्रगती नवतरुणांना उज्वल
यशाच्या मार्गाकडे नेणारी आहे.असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री
श्रीमती संतोष चौधरी यांनी केले.
बाभूळगाव येथील जगदंबा शिक्षण संस्थेच्या एस.एन.डी.अभियांत्रिकी
महाविद्यालयाला त्यांनी भेट देऊन पाहणी केली.शिर्डी येथे साईबाबांच्या
दर्शनाला आल्या असता त्या आवर्जून हा शैक्षणिक कॅम्पस पाहण्यासाठी आल्या
होत्या.त्यांच्या सोबत त्यांचे पती श्री.चौधरी,अतिरिक्त सचिव अनिलकुमार
हेही उपस्थित होते.
श्रीमती चौधरी यांनी संस्थेच्या
अभियांत्रिकी,तंत्रनिकेतन,बी.एड.,डी.एड.,फार्मसी,नार्शिंग,एमबीए,कृषी
महाविद्यालय व ज्यू.कॉलेजच्या कॅम्पसची पाहणी केली.यावेळी म्हाडाचे
विभागीय अध्यक्ष नरेंद्र दराडे व जगदंबा-मातोश्री शिक्षण संस्थेचे
कार्याध्यक्ष किशोर दराडे यांनी त्यांचा स्वागत व सत्कार केला. संस्थेचे
सेक्रेटरी कुणाल दराडे यांनी बाभूळगाव,धानोरे,एकलहरे येथील सुरु असलेल्या
३५ वर महाविद्यालयाची माहिती त्यांना दिली.अल्पावधीत संस्थेने ग्रामीण
भागात प्रगती साधली असून यामुळे अनेक गरीब व सर्वसामान्याना शैक्षणिक
सुविधा आपल्या भागातच उपलब्ध झाली आहे.शिक्षणसाठी मोठ्या शहरात जावे लागत
होते तेच शिक्षण येथे मिळू लागल्याचेही दराडे यांनी सांगितले.
या संस्थेची ग्रामीण भागात वाटचाल अगदी सक्षमतेने सुरु आहे. छोट्या
तालुक्यात इतके अभ्यासक्रम सुरु करून समाजाची सेवा सुरु आहे.यातही संस्था
गुणवत्ता जपत असल्याचे ऐकून आनंद वाटला.या शिक्षण संस्थेने वैद्यकीय
शिक्षणक्षेत्रात पाऊल टाकले आहे.हे स्वप्न पूर्ण करून गुणवत्तापूर्ण
शिक्षनातून नाव मोठे करावे असेही यावेळी श्रीमती चौधरी
म्हणाल्या.संस्थेचे संचालक लक्ष्मन दराडे,वैद्यकीय संचालक डॉ.संपत
भताने,अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.ए.वेंकटेश,प्रशाशकीय
अधिकारी समाधान झाल्टे,प्रा.ठोंबरे आदी यावेळी हजर होते.

" खरं तर देशाच्या मंत्र्यांनी भेट देऊन आमच्या संस्थेच्या प्रगतीचे
कौतिक केले.यामुळे आनंद तर वाटलाच पण त्यांच्या मार्गदर्शनाने पुढील
कामकाजाला दिशा देता येईल.ग्रामीण शिक्षणला अजून बळकट करण्यावर आम्हो
लक्ष्य देत आहोत "
- किशोर दराडे, कार्याध्यक्ष,जगदंबा-मातोश्री शिक्षण संस्था.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity