ताज्या घडामोडी :

.

.
Home » » येवला नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेला सत्ताधारी नगरसेवकच गैरहजर

येवला नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेला सत्ताधारी नगरसेवकच गैरहजर

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, १८ जानेवारी, २०१४ | शनिवार, जानेवारी १८, २०१४

येवला (अविनाश पाटील)- नगर पालिकेच्या सर्वसाधारण सभेला सत्ताधारी
राष्ट्रवादी काँग्रेससह मित्रपक्षाचे 13 नगरसेवक गैरहजर राहिले. विरोधी
नगरसेवकांनी मात्र सर्वसाधारण सभेला उपस्थिती लावल्याने सभेचा कोरम पूर्ण
झाला. शुक्रवारी दुपारी 1 वाजता पालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष नीलेश
पटेल यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा बोलाविण्यात आली होती.
सभेच्या पटलावर 25 विषय ठेवण्यात आले होते. मात्र, सभेस उपनगराध्यक्षा
भारती जगताप, नगरसेवक पंकज पारख, मुश्ताक शेख, मनोहर जावळे, नीता परदेशी,
राजश्री पहिलवान, जयश्री लोणारी, मीना तडवी, सरला निकम, शबाना बानो शेख
या राष्ट्रवादीच्या 10 नगरसेवकांसह काँग्रेसचे संजय कासार व अपक्ष
नगरसेविका पद्मा शिंदे गैरहजर होते. भाजप नगरसेवक सुनील काबरा, छाया
क्षीरसागर यांनी उपस्थिती लावल्याने सभेचा कोरम पूर्ण होऊन सभेत ठेवण्यात
आलेले 25 विषय विरोधकांच्या साथीने मंजूर करण्यात आले. सकाळी झालेल्या
सभेला हजर असलेले सत्ताधारी नगरसेवक दुपारच्या सभेला गैरहजेर राहिल्याने
राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
दरम्यान नगरपालिकेच्या विशेष सभेत शुक्रवारी विषय समिती सदस्यांची निवड
जाहीर करण्यात आली. तहसीलदार हरीश सोनार यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11
वाजता नगरपरिषदेच्या नेहरू सभागृहात विशेष सभा बोलावण्यात आली होती. या
वेळी नगराध्यक्ष नीलेश पटेल, उपनगराध्यक्षा भारती जगताप, मुख्याधिकारी
डॉ. दिलीप मेनकर आदींसह 21 नगरसेवक हजर होते.
समितीनिहाय सदस्य पुढीलप्रमाणे
सार्वजनिक बांधकाम : प्रदीप सोनवणे, पंकज पारख, जयश्री लोणारी, भारती
जगताप, राजश्री पहिलवान, सुनील काबरा
पाणीपुरवठा व जलनिस्सारण : मुश्ताक शेख, पद्मा शिंदे, पंकज पारख, रिजवान
शेख, मीना तडवी, सागर लोणारी
महिला वा बालकल्याण : सरला निकम, उषाताई शिंदे, शिरीन शेख, जयश्री
लोणारी, भारती येवले, छाया क्षीरसागर
वैद्यकीय व आरोग्य : मनोहर जावळे, उषाताई शिंदे, मीना तडवी, अयोध्या
शर्मा, शबाना बानो शेख, बंडू क्षीरसागर
नियोजन व विकास : भारती जगताप, हुसेन शेख, पंकज पारख, उषाताई शिंदे,
राजश्री पहिलवान, सुनील काबरा
शिक्षण समिती : नीता परदेशी, शिरीन शेख, पद्मा शिंदे, संजय खंडाळकर,
अयोध्या शर्मा, बंडू क्षीरसागर
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity