ताज्या घडामोडी :

.

.
Home » » देवनाचा सिंचन साठी जलविज्ञान चे प्रमाण पत्र - भागवत सोनवणे यांच्या पाठपुराव्याला यश

देवनाचा सिंचन साठी जलविज्ञान चे प्रमाण पत्र - भागवत सोनवणे यांच्या पाठपुराव्याला यश

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, २० जानेवारी, २०१४ | सोमवार, जानेवारी २०, २०१४

येवला (अविनाश पाटील) - तालुक्यातील देवदरी येथील देवनाचा सिंचन
प्रकल्पा साठी केंद्रिय जल आयोगाच्या अखत्यारीत असलेल्या जलविज्ञान
संस्थेचे प्रमाण पत्र आज उपलब्ध झाले आहे. त्यामुळे सदर प्रकल्पाच्या
उभारणीच्या मार्गातील एक महत्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे...त्यामुळे
प्रकल्प २०१५ साली पुर्ण होईल आणि लाभार्थी गावांमधील पाण्याचा दुष्काळ
कायमचा संपेल अशी आशा निर्माण झाली आहे. सदर प्रकल्पासाठी ६५ दशलक्ष
घनफुट ( १८४० सहस्त्र घन मिटर ) क्षमतेचे प्रमाण पत्र जलविज्ञान संस्था
, नाशिक यांनी दिले असून प्रकल्पामुळे रहाडी, खरवंडी,देवदरी या गावामधील
१८०० हेक्टर जमीन ओलीताखाली येणार असून अप्रत्यक्ष लाभार्थी म्हणून
भारम,कोळम ,खु. कोळम बु. रेंडाळे, न्यारखेडे खु. न्यारखेडे बु. वाघाळे,
या शिवारातील भूजळ पातळीत वाढ होऊन सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. तसेच ३८
गाव योजने सारखी पेय जल योजना राबविणे शक्य होणार असून एक प्रकारे कायमच
अवर्षण ग्रस्त असलेल्या डोंगरी भागाला जल संजीवनी मिळणार आहे... येवला
तालुक्यातील हा सर्वात मोठा प्रकल्प ठरणार आहे.
सदर प्रकल्प व्हावा यासाठी परिसरातील शेतकरी कृती समितीच्या माध्यमातून
शासनाकडे नियोजन बद्ध व अभ्यासपुर्ण पाठपुरावा करत होते. शासनाचे लक्ष
वेधण्यासाठी शेतकर्‍यांनी अनेक आंदोलने केली होती...त्याची दखल घेत पालक
मंत्री नामदार श्री छगन भुजबळ यांनी जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे यांचे
समवेत मंत्रालयात तापी महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री प्रकाश भामरे,
तापी महामंडळाचे मुख्य अभियंता श्री ह.मे. शिंदे, जलविज्ञान प्रकल्पाचे
मुख्य अभियंता श्री एच. के गोसावी आदि संबधीत अधिकार्‍यांची बैठक ३
सप्टेंबर २०१३ रोजी घेतली होती...सदर बैठक निर्णायक ठरून जलविज्ञान
संस्थेस तापी महामंडळा मार्फत प्रस्ताव सादर करण्यात आला. सदर प्रस्ताव
तयार करणेसाठी कृती समितीचे अध्यक्ष भागवत सोनवणे यांनी तापी खोर्‍यातील
पाणी उपलब्धतेचे तपशील उपलब्ध करण्यात सक्रीय सहभाग घेतला. येवला
तालुक्यातील १९५१ ते २०१३ या ६२ वर्षातील पर्जन्यमान, मन्याड उपखोर्‍यात
बृहत आराखडयातील पुर्ण झालेल्या प्रकल्पांचा पुर्ण झालेल्या
वर्षांपासूनच ओव्हर फ्लो मिटर गेज तपशील, प्रस्तावित प्रकल्पांची क्षमता
या आधारे युक्तीवाद करून प्रमाण पत्र मिळविण्याच्या पाठपुराव्याला यश
मिळवले आहे.
पालक मंत्री नामदार छगन भुजबळ यांनी स्वतः या प्रकल्पासाठी लक्ष
घातल्याने प्रकल्पाला चालना मिळाली आहे. पालकमंत्र्याचे स्वीय सहाय्यक
तसेच येवला संपर्क कार्यालय प्रमुख श्री बाळासाहेब लोखंडे, नाशिक
कार्यालयाचे चे स्वीय सहाय्यक श्री अनिल सोनवणे, व मंत्रालयातील स्वीय
सहाय्यक श्री पी.डी. मलिकनेर यांनी ही या कामी अतिशय मोलाचे योगदान दिले
आहे. आमदार जयंत जाधव यांनी या प्रश्नी नागपुर हिवाळी अधिवेशनात तारांकीत
प्रश्न उपस्थित केला होता.
"आता उर्वरित टप्पे - प्रशासकीय मान्यता, नियोजन मंडळाचा निधी, जमिन
अधिग्रहण, प्रत्यक्ष उभारणी आदि कामे लवकरात लवकर मार्गी लागतील यासाठी
नामदार महोदयांनी लक्ष घालावे अशी परिसरातील शेतकर्‍यांच्या वतीने विनंती
आहे " ( श्री भागवत सोनवणे , अध्यक्ष , देवनाचा सिंचन प्रकल्प संयुक्त
कृती समिती )
नामदार भुजबळ यांचे मुळे आमचे अनेक पिढ्यांचे स्वप्न साकार होणार असून
आमचा दुष्काळ लवकरच संपेल अशी आशा निर्माण झाली आहे. नामदार भुजबळ यांचे
पाठीशी परिसरातील जनता खंबीर पणे उभी राहील - श्री हुसेन अब्बास शेख (
शेतकरी ) रहाडी ता. येवला )
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity