ताज्या घडामोडी :
Home » » येवला अंगणवाडी सेविकांचा पंचायत समितीवर धडक मोर्चा

येवला अंगणवाडी सेविकांचा पंचायत समितीवर धडक मोर्चा

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, २१ जानेवारी, २०१४ | मंगळवार, जानेवारी २१, २०१४

येवला (अविनाश पाटील) - 'बालके कुपोषित, आम्ही उपाशी', 'मानधन नको,
वेतनर्शेणी द्या', 'भाऊबीज नको, बोनस द्या', 'कोण म्हणतो देणार नाही.
घेतल्याशिवाय राहणार नाही', अशा घोषणा देत येवला तालुक्यातील
अंगणवाडीसेविका, मदतनीस यांनी येवला तहसील व पंचायत समितीवर मोर्चा नेऊन
धडक दिली.

अंगणवाडी कर्मचारी सभेचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत साबरे यांच्या
नेतृत्वाखाली सोमवारी दुपारी 1 वाजता हुतात्मा स्मारक येथून घोषणा देत हा
मोर्चा नेण्यात आला. नायब तहसीलदार शंकरराव झाल्टे यांना निवेदन देण्यात
आले. यानंतर पं.स. कार्यालयावर मोर्चा नेला. प्रकल्प कार्यालयासमोर घोषणा
देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले. प्रकल्प अधिकारी के. एम. बागुल व उमेश
राजपूत यांनी निवेदन स्वीकारले. या वेळी रा.कॉँ.च्या माया परदेशी, उषा
रक्ताटे, शीतल शेटे, मीनाक्षी पैठणकर यांनी मनोगत व्यक्त केले.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity