ताज्या घडामोडी :

.

.
Home » » कंनसुधा सीबीएसई स्कुलमध्ये पालकमेळावा संपन्न

कंनसुधा सीबीएसई स्कुलमध्ये पालकमेळावा संपन्न

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, २० जानेवारी, २०१४ | सोमवार, जानेवारी २०, २०१४

येवला - कंचनसुधा सीबीएसई स्कुल मध्येशिक्षक-पालक मेळावा संचालक
मंडळाच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.प्रारंभी कंचनसुधा
एकॅडेमीचे अध्यक्ष अजय जैन ,उपाध्यक्ष रविंद्र छाजेड, समन्वयक अक्षय जैन,
पालक प्रतिनिधी डॉ.भताणे यांच्या हस्ते सरस्वती पुजन व दीपप्रज्वलन
करण्यात आले.प्रास्ताविकात सीबीएसई स्कुलचे प्राचार्य बी.एन.गोसावी यांनी
सीबीएसई पॅटर्नचे महत्व व गरज याबाबत माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या
प्रगतीत शिक्षक व पालक दोघांचे सहकार्य महत्वाचे असल्याचे सांगीतले.
यानंतर डॉ.भताने ,श्री शांताराम बोरसे, श्री विजय चितळकर,सौ मनिषा
सोनवणे,सौ.भदाणे या पालकांनी मनोगतात शैक्षणिक तसेच व्यवस्थेसंदर्भात
काही सूचना मांडल्या. यावेळी कंचनसुधा एकॅडेमीचे अध्यक्ष अजय जैन यांनी
पालकांच्या केलेल्या सूचनांचा आदर करून संस्थेकडून पालकांच्या प्रत्येक
सूचनेची योग्य दखल घेतली जाईल असे सांगीतले. तसेच कंचनसुधा सीबीएसई
स्कुलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासह संगीत, खेळ व
विविध स्पर्धा यातून सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहू.
विद्यार्थ्यामध्ये नैतिक मुल्यांची रुजवणुक करुन संस्कारक्षम समाज
घडवीण्यावर भर देणार असल्याचेही जैन यांनी स्पष्ट केले. यावेळी अक्षय
जैन,रविंद्र छाजेड यांनी मनोगत व आभार व्यक्त केले. सुत्रसंचालन नाजिम
शेख यांनी केले. मेळाव्यासाठी प्रदिप पाटील, पी.एन पंडा, राजेश दास, जुगल
टेटे, अय्युब पठाण, दीपक हारके,औलक गुरुप्रितसिंग, मच्छिंद्र
नाईकवाडे,सुनिता जाधव,आसमा पटेल,हेमंतकुमार साहू, एस जी पंडा या
शिक्षकांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व सीबीएसई स्कुलचे पहिली ते
दहावीचे विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity