ताज्या घडामोडी :

.

.
Home » » येवला ते रवंदा बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी

येवला ते रवंदा बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, २ फेब्रुवारी, २०१४ | रविवार, फेब्रुवारी ०२, २०१४

येवला : (अविनाश पाटील ) येवला आगाराने येवला ते रवंदा बससेवा पूर्ववत
सुरू करण्याची मागणी कोपरगाव तालुका काँग्रेसचे कारभारी हरी खैरे आणि
रवंदे ग्रामस्थांनी एका निवेदनाद्वारे आगारप्रमुखांकडे केली आहे.या
मार्गावरील पारेगाव , निमगाव मढ येथील विद्यार्थी व विद्यार्थीनी यांना
शिक्षणासाठी येवला व कोपरगाव कडे जाण्यासाठी सदर बससेवेची नितांत गरज
आहे. तसेच कोपरगाव तालुक्यातील अनेक शेतकरी, व्यापारी व विद्यार्थीही
येवला शहरात विविध कामानिमित्ताने या मार्गाने ये-जा करत असतात.
येवला-रवंदा रस्त्याची मोठी दुरावस्ता झाली असून तातडीने रस्ता
दुरुस्तीचे काम हाती घेणे गरजेचे बनले आहे. येवला - रवंदा रस्त्याचे काम
तातडीने पुर्ण करुन येवला-रवंदा बससेवा तात्काळ चालु करण्यात यावी अशी
मागणी येवला - रवंदा परिसरातूनही केली जात आहे.दरम्यान सदर बससेवा
तातडीने पूर्ववत सुरू न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही सदर
निवेदनाच्या शेवटी कारभारी हरी खैरे आणि रवंदे ग्रामस्थांनी दिला आहे.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity