ताज्या घडामोडी :

.

.
Home » » कंचनसुधा अकॅडेमीच्या कलारंग सोहळ्याने येवलेकर झाले मंत्रमुग्ध

कंचनसुधा अकॅडेमीच्या कलारंग सोहळ्याने येवलेकर झाले मंत्रमुग्ध

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, ११ फेब्रुवारी, २०१४ | मंगळवार, फेब्रुवारी ११, २०१४

येवला - शनिवार ८ फेब्रुवारी येवल्याच्या सांस्कृतिक इतिहासात महत्वाचा
दिवस ठरला आहे. ५ हजारांच्या वर जनसमुदाय,स्टेजवरील नेत्रदिपक
रोषणाई,आधुनिक साऊंडसिस्टिम,मोठी स्क्रिन, चित्रपट व टिव्हीवरील गाजलेले
कलाकारांची साथ अश्या प्रकारचे वातावरणात प्रथमच आपली
कला सादर करण्याचे भाग्य कंचनसुधा अकॅडेमीच्या विद्यार्थ्यांना लाभले.
फक्त टीव्हीवर पाहिलेले आणि ऐकुन असलेले वातावरण या बालगोपाळांनी
प्रत्यक्ष अनुभवले आणि स्वतःचे नवखेपणा जाणवु न देता मोठ्या धिटाईने आपली
कला येवलेकरांसमोर सादर केली. निमित्त होते कलारंग या स्नेहसंमेलन
सोहळ्याचे.कंचनसुधा अकॅडेमी इंग्रजी माध्यम व कंचनसुधा सीबीएसई स्कुलचा
शनिवार ८ फेब्रुवारीला झालेला प्रथम वर्षाचा हा स्नेहसंमेलन सोहळा
येवल्याच्या सांस्कुतिक इतिहासाचा सुवर्णक्षण ठरला आहे.
टीव्हीवरील मराठी हास्यकलाकार व अभिनेते, अत्याधुनिक स्टेज,
साउंडसिस्टीम, अशा वातावरणात येवलेकर भारावून गेले. झी टिव्ही वरील फु
बाई फु या लोकप्रिय कार्यक्रमातील कलाकार अतुल तोडणकर,अंशुमन विचारे
मराठी चित्रपट लेखक व कलाकार प्रकाश भागवत यांच्या साथीने सादर होणारी
आपल्याच येवल्याचा चिमुकल्यांची कला पाहुन येवलेकराची चांगलीच करमणुक
झाली. अप्सरा आली, चला जेजूरीला जाऊ, सत्यम शिवम सुंदरम, बुमरो बुमरो,
आयो रे मारो ढोलना,देस रंगिला रंगिला, इट हॅपन्स ओन्ली इन इंडिया,सुनो
गौरसे दुनिया वालो, बुरी नजर ना हमपे डालो, अशी दज्रेदार गीते व त्यावर
विद्यार्थ्यांनी धरलेला ठेका याचे चित्रण अनेकांनी मोबाईल मध्ये कैद
केले. महाराष्ट्र दर्शन कार्यक्रमात महाराष्ट्रातील लोककला सादर करण्यात
आली. वासुदेव, पोतराज,मावळे,कडकलक्ष्मी,नउवारी अशा विविध वेशभुषेने
विद्यार्थी लक्ष वेधुन घेत होते. फु बाई फु च्या कलाकारांनी हसवलेले व
प्रकाश भागवतांच्या रंगतदार सुत्रसंचालनाने भारावलेल्या वातावरणात
कंचनसुधा च्या विद्यार्थ्यांच्या बेटी बचाव संदेश देणाऱ्या नाटिकेने
कार्यक्रमाची सर्वोच्च् उंची गाठली. या वेळी उपस्थित गहिवरुन गेले.
समाजातील या भिषण वास्तवतेला लहान मुलांनी नाटिकेत प्रकर्षाने मांडले. या
समाजाला विचारमुख करायला लावणाऱ्या नाटिकेने अनेकांच्या डोळ्यात अश्रू
आणले. कश्मीरी संस्कुतीवर आधारित नृत्यकला, राजस्थानी नृत्यकला,
महाराष्ट्रीयन लावणी, गुजराथी गरबा, भरतनाट्यम आणि भारतमातेचा जयघोष
करणारी गाणी विद्यार्थ्यांनी सादर केली. शहरातच नव्हे तर तालुक्यातच
कधीही न झालेला असा अपुर्व कलारंग स्नेहसंमेलन सोहळा पाहुन येवलेकरांनी
सांस्कृतिक कार्यक्रमाला खरोखरच सलाम केला.हास्य , राष्ट्रप्रेम,
महाराष्ट्र लोककला , सामाजिक संदेश या विविध विषयावरील नृत्य, नाटिका
यांनी उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाच्या शेवटी बक्षिस वितरण सोहळा
कलावंताच्या हस्ते पार पडला. विद्यार्थ्यांनी वर्षभरात केलेल्या
कामगिरीसाठी प्रशस्ती पत्र व ट्रॉफी देऊन त्यांना प्रोत्साहीत केले
गेले.सिया भालादरे , अफजल पठाण यांना बेस्ट स्टुडंट ऑफ ईयर ट्रॉफी
मिळाली. कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष रामदास दराडे, मातोश्री शिक्षण
संस्थेचे किशोर दराडे, माजी नगराध्यक्ष पंकज पारख,नगराध्यक्ष निलेश पटेल,
उद्योजक सुशिलशेठ गुजराथी, नगरसेवक बंडू क्षिरसागर, नगरसेविका जयश्री
लोणारी,छाया क्षिरसागर, एड.जुगरकिशोर कंलत्री,राजेश भांडगे, संस्थचे
अध्यक्ष अजय जैन, समन्वयक अक्षय जैन, विश्वस्त रविंद्र जैन प्राचार्य
दंवगे, प्राचार्य गोसावी, यांच्यासह शहरातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
सुत्रसंचालन सौ.चित्रा पाटील-वाघ व नयना गोरे यांनी केले.कंचनसुधा
अकॅडेमी व कंचनसुधा सिबीएसई च्या सर्व कर्मचारी वर्गाबरोबरीने कार्यक्रम
यशस्वीतेसाठी नेमीचंद कांकरिया, अनिल जाधव,योगेश सोनी, राजेंद्र पवार
यांच्यासह अजय जैन मित्र परिवार प्रयत्नशिल होते.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity