ताज्या घडामोडी :

.

.
Home » » पुणेगाव-दरसवाडी कृती समितीमध्ये फूट......अध्यक्ष आप्पासाहेब कदम वापरून घेत असल्याचा सदस्यांचा आरोप

पुणेगाव-दरसवाडी कृती समितीमध्ये फूट......अध्यक्ष आप्पासाहेब कदम वापरून घेत असल्याचा सदस्यांचा आरोप

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शुक्रवार, १४ फेब्रुवारी, २०१४ | शुक्रवार, फेब्रुवारी १४, २०१४

येवला (अविनाश पाटील)- पुणेगाव-दरसवाडी कृती समितीमध्ये अध्यक्षांच्या
अकार्यक्षमतेमुळे फुट पडली असून स्वतःचे राजकिय हितसंबंधासाठी समितीचा
वापर ते करीत असल्याचा आरोप करीत कृती समितीचे संस्थापक सदस्य संजय
पगारे,रामचंद्र घोडके,भाऊ लहरे,बद्रीनाथ कोल्हे,शिवाजी भालेराव,पोपटराव
एंडाईत,प्रकाश जानराव यांनी समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब कदम यांच्यावर
कडाडून टिका करुन समितीला राम राम ठोकला आहे.
येवला तालुक्याच्या दुष्काळी उत्तर-पुर्व भागासाठी १९७९ मध्ये आमदार
जनार्दन पाटील यांच्या कार्यकाळात पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव कालव्याचे
काम झाले. मात्र धरणातून थेट कालव्याव्दारे साठवण बंधारे भरण्याच्या
योजनेस निधी कमी पडला आणि हे काम बंद पडले. नंतर २००३ मध्ये यासाठी नगर
जिल्ह्यातून येऊन आप्पासाहेब कदम यांनी सहकाऱ्यांच्या साह्याने समिती
स्थापना करुन लढा देण्याचे ठरवले.परंतू गेल्या ८-१० वर्षांमध्ये
अप्पासाहेब कदम यांनी सत्ताधाऱ्यांची मर्जी सांभाळली त्यांच्या विरोधात
आंदोलन करण्याचे टाळले. आणि आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा
बैठकांचे आयोजन करण्यास सुरुवात केली.राष्ट्रवादी कॉग्रेसचे पदाधिकारी
असलेले आप्पासाहेब कदम यांनी या कामासाठी पक्षाच्या मंत्र्याविरोधात जाऊन
भुमिका घेऊ शकले नाही.
याबाबत आपले मत व्यक्त करताना प्रा.शिवाजी भालेराव व इतर सदस्य म्हणाले,
कृती समितीचे अध्यक्ष सत्ताधाऱ्यांच्या दावणीला बांधले गेलेले असल्याने
त्यांच्या विरोधात आंदोलन करीत नाही. सर्वपक्षीय नावाने कृतीसमितीला
राजकिय रंग आला असून निष्ठावान कार्यकर्त्यांचा वापर करुन राजकारण
करण्याचा डाव असून कृती समितीतून निष्ठावानांना डावलून कदम यांनी राजकिय
वर्दळ वाढवली.अश्याच धिम्या गतीने काम चालल्यास पुढच्या पिढीला सुध्दा
पाणी पहायला मिळणार नाही.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity