ताज्या घडामोडी :

.

.
Home » » कुटुंबप्रमुखाच्या मृत्युनंतर आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबाला शैक्षणिक कार्यासाठी येवला नगराध्यक्षाकडून ११ हजाराची रोख मदत

कुटुंबप्रमुखाच्या मृत्युनंतर आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबाला शैक्षणिक कार्यासाठी येवला नगराध्यक्षाकडून ११ हजाराची रोख मदत

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०१४ | शुक्रवार, फेब्रुवारी २८, २०१४

येवला - (अविनाश पाटील) घरातील कर्ता पुरुष अपघाती गेल्यावर कोणत्याही
कुटुंबावर आभाळ कोसळते. दैनंदिन गरजेबरोबर त्या व्यक्तीचे मुलामुलींचे
शैक्षणिक खर्चाचा प्रश्न उभा राहतो. त्यात ते आर्थिक स्थिती खराब असली
म्हणजे बहुतेक वेळा ते खंडीत होते. काही दिवसांपुर्वी येवला कृषी उत्पन्न
बाजार समितीमध्ये पाणी वाटप करणारे नंदकिशोर बाबुलाल टकले यांचा अपघाती
मुत्यू झाला. मुळातच गरीबी असलेल्या या कुटुंबावर आर्थिक संकट उभे
राहीले. अपघातानंतरच्या औषधोपचारामध्ये या कुटुंबाकडे असलेली सर्व
जमापुंजी या कामी खर्च पडली. त्यामुळे हे कुटुंब अधिकच खचले असताना
येवल्याच्या माजी नगराध्यक्षा, येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या
संचालिक व विद्यमान नगरसेविका सौ.उषाताई माणिकराव शिंदे यांनी नगराध्यक्ष
निलेश पटेल यांना हे वास्तव सांगीतलेवर नगराध्यक्ष निलेश पटेल यांनी
ताबडतोब ११ हजार रुपयांची रोख स्वरुपात रक्कम श्रीमती ललीता नंदकिशोर
टकले यांच्याकडे दिली. आज समाजात स्वमग्नता वाढलेली असताना सामाजिक
जाणिवतेचे भान ठेऊन निलेश पटेल यांनी केलेल्या या मदतीने समाजापुढे आदर्श
निर्माण केला आहे. शैक्षणिक कार्यासाठी मदत देणारे दातृत्व यानिमित्ताने
समाजापुढे आल्याची भावना निर्माण जनतेत झाली असल्याचे दिसून येते.
स्वखर्चाने नगरापालिकेची आर्थिक बचत करण्याबरोबर समाजाच्या गरजेच्या वेळी
धाऊन जाण्याचे भान नगराध्यक्ष निलेश पटेल यांनी दाखवले आहे.
यावेळी नगरसेविका उषाताई शिंदे, नगरसेविका जयश्री लोणारी, नगरसेविका शेख
शबाना बानो रफिक अहमद, नगरसेविका सौ.सरला निकम,नगरसेविका सौ.निता परदेशी,
नगरसेविका सौ अयोध्याबाई शर्मा,नगरसेविका सौ.भारती येवले, नगरसेविका
सौ.मिना तडवी, नगरसेविका सौ छाया क्षिरसागर, नगरसेवक सागर लोणारी, गटनेते
- नगरसेवक प्रदिप सोनवणे, नगरसेवक बंडू क्षिरसागर व मुख्याधिकारी
डॉ.दिलीप मेनकर आदी उपस्थित होते.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity