ताज्या घडामोडी :

.

.
Home » » ना.भुजबळ यांच्या लोकसभेच्या उमेदवारीला येवल्यातून विरोध, येवला विधानसभा मतदारसंघातच राहण्याची मागणी......शनिवारी रास्ता रोको ....येवला बंदची हाक

ना.भुजबळ यांच्या लोकसभेच्या उमेदवारीला येवल्यातून विरोध, येवला विधानसभा मतदारसंघातच राहण्याची मागणी......शनिवारी रास्ता रोको ....येवला बंदची हाक

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शुक्रवार, २८ फेब्रुवारी, २०१४ | शुक्रवार, फेब्रुवारी २८, २०१४

येवला (अविनाश पाटील) राष्ट्रवादी कॉग्रेसच्या लोकसभा उमेदवारीच्या
यादीमध्ये नाशिक साठी ना.छगन भुजबळ यांचे नाव आल्याने येवला तालुक्यातील
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या मध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पक्षाचा निर्णयाला बांधील असणारे ना.भुजबळांचे कार्यकर्ते या निर्णयाच्या
विरोधात उतरले आहे. तालुक्यातील सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांनी
राजीनाम्याचे हत्यार उपसले आहे. दि.१ मार्च रोजी विंचूर चौफुलीवर
राष्ट्रवादीतर्फे विराट रास्ता रोको करण्याचे व येवला बंदचे आज ना.भुजबळ
संपर्क कार्यालयात झालेल्या बैठकीत ठरले आहे.
नाशिक जिल्हा मराठा विद्या प्रसारकचे संचालक अंबादास बनकर यांच्या
अध्यक्षतेखाली संपर्क कार्यालयात बैठक झाली. या बैठकीमध्ये नगराध्यक्ष
निलेश पटेल यांनी आपले मनोगतात सांगीतले की साहेबांच्या नाशिक
उमेदवारीमुळे येवला मतदारसंघावर बिकट समस्या उभी राहणार आहे,
सर्वसामान्यापुढे उद्या आपले काय हा प्रश्न उभा राहीला आहे. उद्या रास्ता
रोको करून याचा निषेध नोंदवला जाणार असून साहेबांना भेटणार असल्याचेही ते
म्हणाले. येवला बाजार समितीचे गटनेते अरुण काळे यांनीही साहेबांनी
येवल्यातच रहावे अशी जोरदार मागणी केली.
सरपंच परिषदेचे मोहन शेलार म्हणाले की, साहेबांशिवाय येवला पोरका राहणार
आहे, येवल्याला वाऱ्यावर सोडू नये म्हणून साहेबांकडे प्रमुख नेत्यांनी
विनवणी करावी.
अंबादास बनकर यांनी आपल्या मनोगतात येवला तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या
अनेक योजना पुर्ततेसाठी छगन भुजबळ यांनी येवल्यातूनच उमेदवारी करावी अशी
मागणी केली. येवल्यातूनच साहेबांना मुख्यमंत्री झालेले आम्हाला पाहायचेय
असेही ते म्हणाले. साहेबांनी येवला सोडल्यास सर्वसामान्याचे जास्त नुकसान
होील असेही ते म्हणाले. यावेळी राजेश भांडगे,प्रकाश वाघ,विनायक भोरकडे,
वसंत पवार,अशोक संकलेचा,प्रविण पहिलवान,जलील शेख,पुंडलिक वरे, विष्णुपंत
कऱ्हेकर आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. बैठकीसाठी माजी. जि.प
अध्यक्ष राधाकिसन सोनवणे,शिवाजी वडाळकर,दिपक लोणारी,मनोहर जावळे,दिपक
देशमुख,किशोर सोनवणे,देविदास शेळके,नगरसेविका राजश्री पहिलवान ,,विक्रम
गायकवाड,नगरसेविका जयश्री लोणारी,अयोध्याबाई शर्मा, मायाताई परदेशी,मिना
तडवी,भारती जगताप,समिना शेख, प्रविण गायकवाड, दत्ता निकम,दिनेश
आव्हाड,भास्कर येवले,शरद लहरे, विपुल धुमाळ आदी उपस्थित होते.
दरम्यान या अचानक ठरलेल्या बैठकीला राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाची
अनुपस्थिती होती.तसेच तालुक्यातील काही प्रमुख नेत्यांच्या गैरहजेरीमुळे
जनतेमध्ये तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity