ताज्या घडामोडी :

.

.
Home » » सावित्रीबाई फुले स्मुतीदिन कार्यक्रमास महिला नगरसेविकाची गैरहजेरी.........

सावित्रीबाई फुले स्मुतीदिन कार्यक्रमास महिला नगरसेविकाची गैरहजेरी.........

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, १२ मार्च, २०१४ | बुधवार, मार्च १२, २०१४

येवला - (अविनाश पाटील) आज ज्याच्या उपकारामुळे महिला शिकल्या सवरल्या
आणि पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन विविध क्षेत्रात कार्यरत आहेत ज्यांच्या मुळे हे शक्य झालं त्या सावित्रीबाई फुले यांचा स्मृतीदिन
साजरा करण्यासाठी येवला नगरपालिकेची एकही नगरसेविका उपस्थित राहीलेली नाही. येवला नगरपालिकेमध्ये २५ पैकी १३ महिला नगरसेविका असूनही एकीचीही उपस्थिती या वेळी  नव्हती.ना.भुजबळ यांनी येवला मतदारसंघ सोडू नये यासाठी धाय मोकलून रडताना याच  नगरसेविकाचे फोटो प्रसिध्द झाले होते.आपल्याला या समाजात मानाचे स्थान मिळवून देणे साठी लढणाऱ्या महिलेच्या स्मृतीदिनाला
त्यांनी पाठ फिरवली.
येवला नगरपालिकेत स्मृतीदिनानिमीत्त नगराध्यक्ष निलेश पटेल यांनी
सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. मात्र एका नगरसेविकचे पती या कार्यक्रमास उपस्थित होते. ना.भुजबळ संपर्क कार्यालयातही आज स्मुतीदिनाच्या वेळी एकही महिला
पदाधिकारी उपस्थित नव्हती.येथेही नगराध्यक्ष निलेश पटेल व माजी. जि.प
अध्यक्ष राधाकिसन सोनवणे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. शहरातील
नाट्यगृहासमोरील फुले दांम्पत्यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण
करण्यासाठी कोणत्याही पक्षाची महिला पदाधिकारी आलेली नव्हती येथेही
नगराध्यक्ष निलेश पटेल व माजी. जि.प अध्यक्ष राधाकिसन सोनवणे यांनी
पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला . सावित्रीबाई फुले या प्रथम महिला
शिक्षिका आहेत. काही काळा पूर्वी स्त्रियांना शिकण्यास बंदी होती
तेंव्हा सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांच्या शिक्षणाचा विडा उचलला आणि
समाज व्यावस्थेच्या विरूध जाऊन पुण्यात स्त्रियांसाठी पहिली शाळा सुरु
केली.तेंव्हा त्यांच्या सोबत होते त्यांचे पती क्रांतीसूर्य महात्मा फुले
.
असे म्हणतात जेंव्हा सावित्रीबाई फुले शाळेत शिकवायला जात तेंव्हा लोक
त्यंच्या अंगावर शेणाच पाणी फेकत. पण आज राजकिय आरक्षणाचा फायदा
घेण्यासाठी कार्यरत असलेल्या महिला या नावालाच पदावर असून सर्व सुत्रे
पतीमार्फतच हलवली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. जनतेतही या झेरॉक्स
नेत्यांचीच चलती आहे. नगरपालिकेत झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी नगरसेवक
संजय कासार ,नगरसेवक मनोहर जावळे, नगरसेवक सागर लोणारी , मुख्याधिकारी
डॉ.दिलीप मेनकर, किशोर सोनवणे आदी उपस्थित होते.
संपर्क कार्यालयातील कार्यक्रमास निलेश पटेल, राधाकिसन सोनवणे, दिपक
लोणारी, गणेश पंडीत, लोंढे नाना, हरीभाऊ जगताप, समीर समदडीया आदी उपस्थित
होते.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity