ताज्या घडामोडी :
Home » » येवला नगरपालिका करणार बंदिस्त ट्रॉलीतून कचर्‍याची ने-आण

येवला नगरपालिका करणार बंदिस्त ट्रॉलीतून कचर्‍याची ने-आण

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, २ मार्च, २०१४ | रविवार, मार्च ०२, २०१४

येवला - (अविनाश पाटील) शहरात गोळा होणारा कचरा उघड्या ट्रक किंवा
ट्रॉलीमधून वाहून नेला जातो. मात्र, त्यामुळे परिसरामध्ये आरोग्याचा
प्रश्न निर्माण होत असल्याने यापुढे बंदिस्त ट्रॉलीमधून कचरा वाहून
न्यावा, असा ठराव नगरपालिकेच्या आरोग्य समितीच्या बैठकीत करण्यात आला.
या वेळी स्वच्छता विभागाकडील कामगारांसाठी झाडू, फावडे, पाट्या आदी
साहित्य खरेदी करणे, जंतुनाशक फवारणीसाठी असलेल्या अँपे रिक्षाची
दुरुस्ती तसेच भुयारी गटार योजना या विभागामार्फत राबवण्याबाबत चर्चा
झाली. सध्या शहरातील भुयारी गटार योजना राबवण्याची कार्यवाही सुरू आहे.
त्यामुळे डासांचा त्रास कमी होऊन रोगांना आळा बसणार आहे. सभेस आरोग्य
सभापती मनोहर जावळे, सदस्य उषाताई शिंदे, शेख शबानाबानो, मीना तडवी आदी
उपस्थित होते.
Share this article :
मित्रानो ….
गेले सहा वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity