ताज्या घडामोडी :

.

.
Home » » मारोतीराव पवार शिवसेनेचे उमेदवारी करणार असले तरच आपला त्यांना पाठींबा अन्यथा उमेदवारी करणार . मा.आमदार कल्याणराव पाटील

मारोतीराव पवार शिवसेनेचे उमेदवारी करणार असले तरच आपला त्यांना पाठींबा अन्यथा उमेदवारी करणार . मा.आमदार कल्याणराव पाटील

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, २२ जुलै, २०१४ | मंगळवार, जुलै २२, २०१४

येवला (प्रतिनिधी) - येवला-लासलगाव विधानसभेच्या शिवसेनेच्या
उमेदवारीसाठी माजी आमदार ज्येष्ठ नेते मारोतीराव पवार असले तरच आपण
त्यांचे नेतृत्वाखाली काम करण्यास तयार असल्याचे मत माजी आमदार कल्याणराव
पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. माजी आमदार मारोतीराव पवार
यांनी शिवसेनेत प्रवेश करावा असेही ते म्हणाले. येवल्यात झालेल्या
पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. शिवसेना उमेदवारीच्या विषयावर बोलताना
ते म्हणाले कि भुजबळांचा चक्रव्युह भेदण्यासाठी ज्येष्ठ व अनुभवी उमेदवार
पाहीजे हे पोरासोराचे काम नाही. जर मारोतीराव पवार उमेदवार नसतील तर आपण
उमेदवारी करण्यास तयार आहे. यावेळी त्यांनी संभाजी पवार यांच्या
सेनेप्रवेशाच्या आधीच्या घडामोडी पत्रकारांशी चर्चेत सांगीतल्या. सेना
प्रवेशासाठी झालेल्या बैठकीत आपण मारोतीराव पवार , अर्जुन कोकाटे,अरुणभाई
गुजराथी  यांना शब्द देतांना सांगीतले कि संभाजी पवार यांनी शिवसेनेत
येतांना मारोतीराव पवार यांनाही शिवसेनेत आणावे . मारोतराव पवार यांनी
धृतराष्ट्राची भुमिका व अर्जुन कोकाटे यांनी संजयची भुमिका उठवु नये तर
मारोतीराव पवार यांनी अर्जुनाची भुमिका करावी मी श्रीकृष्णाची भुमिका
करुन सारथ्य करुन त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास तयार असल्याचेही ते
म्हणाले. शिवसेना उमेदवारी संदर्भात ते म्हणाले कि जर मारोतीराव पवार हे
शिवसेनेचे उमेदवार असले तरच मी शिवसेनेची उमेदवारी मागणार नाही व
शिवसेनेचे काम करणार  अन्यथा माझी उमेदवारी विधानसभेसाठी राहणार
आहे.मतदारसंघातील प्रत्येक नेते भुजबळांकडे गेलेले असताना मी पक्षासाठी
भुजबळांविरुध्द मी १० वर्षे लढा दिला. पण बदललेल्या राजकिय परिस्थीतीचा
फायदा घेण्यासाठी आज प्रत्येकजण शिवसेनेत येण्यासाठी धडपड करीत आहे.
शिवसेनेमध्ये यापुर्वी आलेले नेते आज पुन्हा भुजबळांकडे गेलेले आहे. आता
ऐन मोक्याच्या वेळी त्यांना भुजबळ का नकोसे झाले असा सवालही त्यांनी
केला. यामुळे निष्ठावंत शिवसैनिक दुखावले जात असल्याचेही ते
म्हणाले.लोकसभा २०१४ च्या निवडणुकीमध्ये आपण मतदारसंघातील चारही नेते
विरुध्द असताना पक्ष आघाडीला चांगली मते मिळवून दिले.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity