ताज्या घडामोडी :
Home » » विहिरीत बुडून येवल्यात मायलेकींचा मृत्यू

विहिरीत बुडून येवल्यात मायलेकींचा मृत्यू

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, २६ जुलै, २०१४ | शनिवार, जुलै २६, २०१४



येवला तालुक्यातील अंतरवेली  येथे मायलेकी विहिरीत पडून मृत झाल्याची घटना शुक्रवारी दि २५ जुलै सकाळी १0.३0 वाजेच्या सुमारास घडली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अंतरवेली येथील विवाहित महिला आशाबाई भाऊसाहेब गुंजाळ (वय २६) आणि तिची दीड वर्षाची मुलगी त्यांच्या शेतातील घराच्या पाठीमागील विहिरीत पडली, अशी माहिती गावचे माजी पोलीस पाटील अशोक गुंजाळ यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून उपनिरीक्षक बाबूराव बोडखे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, हा घातपात असावा, असा संशय तिच्या नातेवाईकांनी व्यक्त केला असून त्यानुसार पोलीस तपास करीत आहेत.
Share this article :
मित्रानो ….
गेले सहा वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity