ताज्या घडामोडी :

.

.
Home » » अनकाई सरपंच यांचेवर अविश्‍वास ठराव ..........

अनकाई सरपंच यांचेवर अविश्‍वास ठराव ..........

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, २३ जुलै, २०१४ | बुधवार, जुलै २३, २०१४अनकाई ग्रामपंचायतीच्या ९ सदस्यापैक़ी ७ सदस्यांनी सरपंच आशा सोनवणे यांच्या
विरोधात अविश्‍वास ठराव दाखल केला होता. त्यानुसार, आज (दि.२२) रोजी तहसिलदार
शरद मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात
सोनवणे यांचे विरुध्द अविश्‍वास ठराव मंजुर करण्यात आला.
सभेस सरपंच आशा सोनवणे, उपसरपंच राजाराम पवार, सदस्य केशरबाई व्यापारे, नगीना
कासलीवाल, राजुबाई जाधव, मिराबाई बोराडे, चंदभान सोनवणे, जिजाबाई बोराडे, विमल
आहिरे आदी सदस्य उपस्थित होते.
सरपंच इतर सदस्यांना विश्‍वासात घेत नाही, ग्रामपंचायतीमध्ये मनमानी कारभार
करतात, अरेरावीच्या भाषा वापरतात आदी आरोप ठेवुन अविश्‍वास प्रस्ताव दाखल
करण्यात आला होता.
ग्रामपंचायत अनकाई सदस्य संख्या एकुण ९ इतके आहे व सरपंच पद हे सर्वसाधारण
स्त्री आहे. अविश्‍वास ठराव मंजुर होणेकामी सात मतांची आवश्यकता आहे.
उपस्थितांपैकी ७ सदस्यांनी अविश्‍वास ठरावाच्या बाजुने मतदान केले. त्यामुळे
सरपंच आशा सोनवणे यांचे विरुध्दचा अविश्‍वास ठराव मंजूर करण्यात आला.
दरम्यान, सरपंच आशा सोनवणे यांनी सांगितले की, माझ्यावर केलेले सर्व आरोप
अमान्य आहे. मी यापुर्वी दि. १८ जुलै रोजी सरपंच पदाचा राजीनामा सादर केलेला
असून राजीनामा दि. २१ जुलै रोजी पडताळणी झालेला आहे.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity