ताज्या घडामोडी :
Home » » एन्झोकेम विद्यालयाच्या खेळाडूची राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी निवड

एन्झोकेम विद्यालयाच्या खेळाडूची राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी निवड

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, १० डिसेंबर, २०१५ | गुरुवार, डिसेंबर १०, २०१५

एन्झोकेम विद्यालयाच्या खेळाडूची राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी निवड
येवला : वार्ताहर
सेनापती तात्या टोपे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन्झोकेम विद्यालयातील विद्यार्थ्याची ट्रॅडीशनल रेसलिंग स्पर्धेत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड  झाली.एन्झोकेम विद्यालायातील इ 12 वी वाणिज्य शाखेतील
खेळाडू प्रसाद सोनवणे व
ई 11 वि वाणिज्य शाखेतील विद्यार्थिनी प्राजक्ता खैरनार यांनी नाशिक येथील मीनाताई ठाकरे विभागीय संकुलात पार पडलेल्या विभागीय ट्रॅडीशनल रेसलिंग या क्रीडा प्रकारात विजय संपादन करून प्रथम क्रमांक मिळवला, त्यामुळे याची राज्यस्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष पंकज पारख, उपाध्यक्ष सुशिलभाई  गुजराथी, सरचिटणीस संजय कांबळे, मुख्याध्यापक रामदास काहार, उपप्राचार्य जी.बी. गायकवाड, पर्यवेक्षक दत्ता महाले, याचेसह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यानी अभिनंदन केले. या खेळाडूना क्रीडाशिक्षक शेख रिजवान, विजय क्षीरसागर, प्रसेन पटेल, खोडके, सागर लोणारी
आदीचे मार्गदर्शन लाभले.

Share this article :
मित्रानो ….
गेले सहा वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity