ताज्या घडामोडी :

.

.
Home » » येवला पंचायत समितीच्या उपसभापतीपदी भारती सोनवणे यांची बिनविरोध निवड

येवला पंचायत समितीच्या उपसभापतीपदी भारती सोनवणे यांची बिनविरोध निवड

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, ८ डिसेंबर, २०१५ | मंगळवार, डिसेंबर ०८, २०१५

येवला पंचायत समितीच्या उपसभापतीपदी भारती सोनवणे यांची बिनविरोध निवड

येवला : वार्ताहर
येवला पंचायत समितीच्या उपसभापतीपदी भारती सोनवणे यांची बिनविरोध निवड
झाली विघमान उपसभापती जयश्री बावचे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त पदावर सोनवणे यांची निवड करण्यात आली भुजबळ संपर्क कार्यालयात सोमवारी सकाळी दहा वाजता राष्ट्रवादीच्या पंचायत समितीच्या सदस्याची बैठक बोलवण्यात आली होती या बैठकीत आमदार छगन भुजबळ यांनी नागपूर येथून भम् ध्वनीवर उपसभापती पदासाठी भारती सोनवणे यांचे नाव
जाहीर केले उरवरीत चौदा महिन्याच्या कार्यकाळात उपसभापती पदासाठी प्रथम भारती सोनवणे यांना सात महिने तर उरवरित काळासाठी पोपट आव्हाड यांना संधी देण्याचे भुजबळानी नागपूर येथून भम ध्वनी व्दारे जाहीर केले यानंतर अकरा वाजता भारती सोनवणे यानी उपसभापती पदासाठी सोनवणे यांनी दोन अर्ज दाखल केले यावर सुचक म्हणून पोपट आव्हाडl व शिवागी पवार हे दोघे होते.दुपारी बारा वाजता पंचायत समिती सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांतअधिकारी वासंती माळी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा
बोलवण्यात आली होती या सभेत उपसभापती पदासाठी सोनवणे यांनी दाखल केलेले दोन्ही अर्ज मंजूर करण्यात आल्यानंतर एकमेव अर्ज दाखल झालेला असल्याने उपसभापती पदी भारती सोनवणे यांची बिनविरोध निवड प्रांतअधिकारी माळी यांनी जाहीर केली. नवनिर्वाचित उपसभापती याचा सत्कार प्रांतअधिकारी वांसती माळी, अँड माणिकराव शिंदे, भुजबळाचे स्वीय सह्हयक बाळासाहेब लोंखडे यांच्या हस्ते
करण्यात आला यावेळी विशेष सभेत पंचायत समिती सदस्या शिवांगी पवार याची बाजार समिती वर प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली विशेष सभेला पंचायत समितीने सभापती प्रकाश वाघ सदस्य पोपट आव्हाड,जयश्री बावचे ,राधिका कळमकर ,शिवांगी पवार,हरिभाऊ जगताप हे उपस्थित होते.या प्रसंगी राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस ॲड.माणिकराव शिंदे, बाळासाहेब लोखंडे, गटविकास अधिकारी सुनिल
आहिरे , नगराध्यक्ष प्रदिप सोनवणे, माजी. जि.र.अध्यक्ष राधाकिसन सोनवणे,राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शेवाळे,साखरचंद साळवे , जिल्हा परिषद सदस्य साईनाथ मोरे,प्रविण गायकवाड ,वंसत पवार,सचिन
कळमकर,सुभाष निकम,सुनिल पैठणकर,छगन सोनवणे,सतिष पैठणकर,दत्तु देवरे,देविदास निकम,भाऊसाहेब धनवटे,संतोष खैरनार, योगेश गंडाळ ,राजु पवार ,मनोज सांगळे,सुभाष गांगुर्ड,संतोष पैठणकर आदी सह मोठ्या संख्येने राष्ट्रवादी समर्थक उपस्थित होते. नगरसूल गणाला मिळाले पहिल्यांदा उपसभापती पद नगरसूल येथिल व नगरसूल गणाच्या सदस्या भारती छगन सोनवणे यांना उपसभापती संधी मिळाल्याने नगरसूल
,चांदगाव,नायगव्हाण गावा सह गणातील गावा मध्ये आतष बाजी ,ढोल ताशा वाजून जल्लोष करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थां उपस्थित होते. 
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity