ताज्या घडामोडी :

.

.
Home » » कोटमगांव (खुर्द) जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

कोटमगांव (खुर्द) जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, २१ मार्च, २०१७ | मंगळवार, मार्च २१, २०१७

कोटमगांव (खुर्द) जिल्हा परिषद शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न.

येवला - वार्ताहर

तालुक्यातील कोटमगांव (खुर्द) जिल्हा परिषद शाळेमध्ये नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेतील १ली ते वी या वर्गातील विद्यार्थ्यांनी सुंदर वेशभूषा करुन अप्रतिम न्रुत्य कलाविष्कार सादर करुन रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. शालेय परिसरात केलेली दिव्यांची रोशनाई ,पडदे पालक वर्गाचा मोठा प्रतिसाद,भरघोष बक्षीसे ,शालेय समितीचे सहकार्य,ग्रामपंचायत पदाधिकारी यांची मदत.उत्साह वाढविणारी समाधानाची बाब होती. याप्रसंगी महिला दिनाच्या विजेत्या स्पर्धक महिला अध्यक्ष चषक स्पर्धेतील विद्यार्थी यांना बक्षीसे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.संमेलनाच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांनी स्रि भ्रुण हत्या विरोधी पर्यावरणा विषयी प्रबोधनपर नाटीका सादर करुन संदेश दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक सुभाष विंचू तर संपुर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संजय वर्पे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनीषा सोनवणे,अनिता शिरोळे, सीमा जाधव यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी जिल्हा दुध संघाचे मा.चेअरमन शरद लहरे पा. सरपंच नामदेव माळी,उपसरपंच योगीता लहरे,शालेय समितीचे अध्यक्ष जनार्दन कोटमे,  सदस्य प्रविण लहरे ,चाँद शाह, तुकाराम पवार ,योगीता लहरे इनताज शाह, मारुती मोरे, गणपत पा.लहरे ,नानासाहेब लहरे,किसन आदमने,नंदिनी शुळ,ज्योती घोडेराव, दत्तात्रय कोटमे,नवनाथ कोटमे,बाबुराव कोटमे,गणेश लहरे,सिकंदर कादरी आदी मान्यवर शिक्षक कुमकर सर मुजावर सर ,सोनवणे सर शिपी सर बुळे सर रणजीत परदेशी सर उपस्थित होते. आभार प्रदर्शन संजय वर्पे यांनी मानले.

 

Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity