ताज्या घडामोडी :
Home » » येवल्याचे प्रसिद्ध व्यापारी सुरेशचंद संघवी यांच्या संथारा व्रताचा तीसरा दिवस

येवल्याचे प्रसिद्ध व्यापारी सुरेशचंद संघवी यांच्या संथारा व्रताचा तीसरा दिवस

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, २९ मार्च, २०१७ | बुधवार, मार्च २९, २०१७

 


येवल्याचे प्रसिद्ध व्यापारी सुरेशचंद संघवी यांच्या संथारा व्रताचा तीसरा दिवस

 येवला - वार्ताहर

शहरातील प्रसिद्ध व्यापारी सुरेशचंद हरकचंद संघवी यांनी वयाच्या ७२ व्या वर्षी संथारा व्रत धारण केले असून बुधवारी या व्रताचा तीसरा दिवस होता. सद्या शहरात त्यांच्या दर्शनासाठी जैन व जैनेत्तर बांधवांनी संपूर्ण राज्यभरातुन गर्दी केली आहे.
ज्ञान गच्छाधिपती प. पू. प्रकाशचंदजी म. सा. यांचे सुशिष्य प. पू. विरेंद्रमुनीजी म. सा. यांच्या मुखारविंदाने जैन धर्मानुसार शहरातील प्रसिद्ध व्यापारी सुरेशचंद संघवी यांनी संथारा व्रत २७ मार्च रोजी दुपारी ३ वाजून ४० मिनीटांनी अंगीकारले आहे. सर्व धर्मीयांनी दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन येवला जैन श्रावक संघाचे संघपती विजयकुमार श्रीश्रीमाळ यांनी केले आहे.


Share this article :
मित्रानो ….
गेले सहा वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity