ताज्या घडामोडी :

.

.
Home » » विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांची मुखेडला आढावा बैठक संपन्न

विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांची मुखेडला आढावा बैठक संपन्न

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, १२ मार्च, २०१७ | रविवार, मार्च १२, २०१७




विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांची मुखेडला आढावा बैठक संपन्न 


येवला : वार्ताहर

   मुखेड ता.येवला येथे विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांची आढावा बैठक संपन्न झाली. त्यात ग्रामस्थांनी आपले विविध प्रश्न, अडीअडचणी व व्यथा मांडल्या. आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डाॅ.मनदुमले हे पाच वर्षापासून अनधिकृतपणे गैरहजर आहे हे त्यांच्या निदर्शनास आणुन दिले.  त्यांनी तात्काळ जिल्हा आरोग्य अधिकारी यांना संपर्क करून याबाबत अधिक माहिती घेतली त्यानुसार सदर वैद्यकीय अधिकारी यांना कार्यमुक्त करून रिक्त पदावर तात्काळ नेमणूक करण्याचे आदेश दिले.
मुखेड ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत ग्रामस्थांनी  मुखेड प्राथमिक आरोग्यकेंद्रात असलेले वैद्यकीय अधिकारी डाॅ.मनदुमले हे  पाच वर्षापासून अनधिकृतपणे गैरहजर आहेत त्यांच्या अनुपस्थितीमुळे वैद्यकीय अधिकारी डाॅ.अशोक बनसोड हे अपुरे कर्मचारी असतांना आरोग्यकेंद्र सांभाळत आहे, जिल्हा बँकेत शेतकरी वर्गाबरोबर नोकरदार वर्गालाही खात्यावरील रक्कम काढण्यासाठी काट्यावरची कसरत करावी लागत आहे, पेयजल योजना,  प्रकल्पग्रस्तांना भरपाई याबाबत निवेदन सादर केले.  अशा विविध विषयावर आढावा घेतला. भुमिगत गटारी पाहणी करून पशुवैद्यकिय दवाखान्यास  भेट दिली.
यावेळी त्यांचेसोबत अधिकारी नागरे, प्रांत वासंती माळी, तहसिलदार नरेश बहिरम, गटविकास अधिकारी सुनिल आहिरे, जि.प.सदस्या कमल आहेर, सरपंच सचिन आहेर, छगन आहेर, उपसरपंच सुलोचना वाघ, ग्रामपंचायत सदस्य अनंता आहेर,धनंजय आहेर, संजय पगार, भानुदास आहेर, महेश भवर, बिपीन धनराव, कुसुम गुंड, उषा जिरे, शशिकला पगार, सरला आहेर, डाॅ.अस्मिता साताळकर, मिराबाई भवर, ग्रामसेवक सोमनाथ वडितके, तलाठी टीळे, संतोष आहेर, साहेबराव आहेर, विठ्ठल कांगणे, सदाशिव शेळके, मोहमद तांबोळी, डाॅ.शेळके, संदिप जाधव आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटोखाली- मुखेड ता.येवला येथे विभागीय आयुक्त एकनाथ डवले आढावा घेतांना.
छायाचित्र : दिपक आहेर, मुखेड


Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity