ताज्या घडामोडी :
Home » » श्री क्षेत्र पारेगाव ते श्री क्षेत्र पैठण पायी दिंडीचे सोहळ्याचे ४२ वे वर्ष पूर्ण .........!

श्री क्षेत्र पारेगाव ते श्री क्षेत्र पैठण पायी दिंडीचे सोहळ्याचे ४२ वे वर्ष पूर्ण .........!

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, १२ मार्च, २०१७ | रविवार, मार्च १२, २०१७


 

श्री क्षेत्र पारेगाव ते श्री क्षेत्र पैठण पायी दिंडीचे सोहळ्याचे ४२ वे वर्ष पूर्ण .........!

येवला - वार्ताहर 

संत एकनाथ महाराज यांच्या पैठण येथील नाथ षष्टी सोहळ्या निमित्त गेल्या ४० वर्षापासून ह.भ.प कै विठ्ठलतात्या खिल्लारे यांनी सुरु केलेल्या येवला तालुक्यातील पारेगाव ते पैठण या दिंडी सोहळ्यास ४१ वर्षे पूर्ण झाली आहे  दिंडीचे यावर्षीचे  प्रस्थान पारेगाव येथून दि रविवार दि ०९/३/२०१७ रोजी झाले असुन् यानंतर  कोटमगाव,गवंडगाव,वैजापूर महालगाव,गंगापूर,ढोरेगाव,इसारवाडी आदी गावे एकूण १४० किमी चा पायी चालत कडक उन्हाची तमा न बाळगता   नाथभजनाच्या जय घोष करत  आणि टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका घेत घेत  असा ८ दिवसांचा मुक्काम करत दिंडी सोहळा  नाथ षष्ठीच्या दिवशी पैठण येथे पोहोचणार आहे . दिंडीत एकूण शेकडो  भाविक सहभागी झाले  आहे यात महिला आणि  अबालवृद्धांची संख्या लक्षणीय आहे  दिंडी सोबत प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी पंचाक्रोशीतील प्रसिद्ध कीर्तनकरांच्या कीर्तनाची मेजवानी भाविकांना मिळणार आहे  यात ह.भ.प बाबुनाना आहेर  ब्राम्हणगावकर,ह.भ.प तात्या महाराज येसगावकर, ह.भ.प वनिता ताई पाटील भिवंडी,ह.भ.प बाळूमहाराज पळे,ह.भ.प बापू महाराज पोटे,ह.भ.प रंगनाथ बाबा महालखेडेकर,आदी 

दरम्यान मुक्कामाच्या ठिकाणी व दिंडी मार्गावर नाश्ता व जेवणाची सोय मुक्कामी असलेल्या ठिकाणचे  स्थानिक गावकरी मंडळी करतात हि सेवा गेली ४१ वर्षापासून अखंडित सुरु आहे व यापुढे देखील अशीच सुरु राहील   अशी माहिती दिंडीचे व्यवस्थापक  केशव ढगे , दौलत सुरासे यांनी दिली.   

 

सोबत श्री क्षेत्र पारेगाव येथील दिंडी सोहळा प्रस्तानाचे फोटो दिले आहेत 

 


Share this article :
मित्रानो ….
गेले सहा वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity