ताज्या घडामोडी :

.

.
Home » » येवल्यातील वनवासी श्री राम मंदिर

येवल्यातील वनवासी श्री राम मंदिर

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, ३ एप्रिल, २०१७ | सोमवार, एप्रिल ०३, २०१७


शहरातील गंगादरवाजा भागातील जागृत वनवासी श्री राम मंदिर शहरासह तालुक्यात प्रसिद्ध आहे दरवर्षी येथे रामनवमी निमित्त नऊदिवसांचा उत्सव आयोजित करण्यात येतो 
  या बद्दलची दंतकथा अशी की इ.स. १८०० च्या काळात विदर्भ नगरीत नागपुर येथे विठोबा नावाचे गृहस्थ राहत होते आपल्या संसार मय जीवनात पति पत्नी दोघांची श्री रामा वर अपार श्रद्धा होती त्याना पुढे दोन मुले झाली एक लक्ष्मण तर दूसरा गोविन्द गोविंद शांत व बालवयातच प्रभु प्रेमात मग्न असायचा त्याच्या या वैराग्य वृत्तीमुळे बालवयातच त्याचे लग्न करुण आई वडिलांनी त्याला संसारात टाकले परंतु लग्नानंतर तो अधिकच विरक्त झाला व त्याने घर सोडले तो रामनामाच्या घोषात हिमालयात गेला मुखात सतत देवाचे नामस्मरण करणारा गोविंद एक सिध्द पुरुष किसनबुवा रामदासी हे समर्थ रामदासाचे शिष्य होते त्यांच्या चरणी लीन झाला तेथे त्याने तपश्चर्या केलि कंदमुळे,झाडपाला,फळे खाऊन १२ वर्षे तपात त्याला भगवान् श्रीरामांनी दर्शन दिले पुढे गोविंद गुरु किसनबुवा कड़े गेला तेथे गुरुंच्या आदेशाने गोविंदने गृहस्थाश्रम स्वीकारला व नागपुर येथे आल्यावर प्रभु रामांच्या दृष्टांताने नाशिक जिल्ह्यातील येवलवाड़ी येथे पूर्वीच्या काळी साधू संतांनी समाधि घेतल्या आहेत व येथील दंडकारण्यात वनवासात असतांना प्रभु रामचंद्र,बंधू लक्ष्मण,माता सीतेने या भूमीवर विश्राम करुण दूस-या दिवशी नाशिक कड़े प्रस्थान केले असल्याने या पावन भूमित श्रीराम मंदिर स्थापना केलि 
   श्रीराम मंदिराची उभारणी झाल्या नंतर सिंहासन तयार झाल्यावर एके दिवशी गेंदूबुवा भक्तांसह मंदिराच्या बाहेर संत समागम करीत असतांना अकस्मात बैलगाड़ी येवून उभी राहिली व गेंदूबुवाना आवाज देऊन श्रीराम,लक्ष्मण,सितेसह मूर्ति दिल्या व आदेश दिला की,तुम्ही या मुर्तिंची प्राणप्रतिष्ठा करा,इतके सांगून बैलगाड़ी अदृश्य झाली, तेव्हा येवला येथे रामाचे मंदिर स्थापन झाले या मंदिरा साठी भक्तांनी सहकार्य केले. 
आज हे मंदिर जागृत वनवाशी श्रीराम मंदिर या नावाने येवला शहराच्या गंगादरवाजा भागात दिमाखाने उभे आहे  आजही रामनवमीच्या उत्सवास येथे हजारो भक्त दुरवरून येथे दर्शनास येतात वनवासी श्रीराम मंदिरास जगदगुरु साईनाथ बाबा यांनी भेट दिली व येवल्याची भूमि पावन केलि मंदिराचे पुजारी गेंदूबुवा व साईबाबा यांची भेट होऊन मंदिराची महती वाढविण्यास सांगितले. गोविंदाचीच पुढे गेंदूबुवा असे महती झाली भक्तानीच त्यांचे नाव गेंदूबुवा रामदासी असे ठेवले. 
  दरवर्षी वनवासी राम मंदिरात चैत्र शुक्ल प्रतिपदे पासून रामनवमी पर्यंत कथा,कीर्तन,महिला मंडलाच्या वतीने कथा,पुराण चालू असते येथे राममंदिरासमोरच हनुमानाचे मंदिर आहे तेथेही हनुमान जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडतो चैत्र शुक्ल द्वादशीच्या दिवशी दरवर्षी प्रमाणे भंडा-याचे आयोजन केले जाते हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी ६ ते ७ च्या दरम्यान जयंतीचा उत्सव साजरा केला जातो तर रामनवमीच्या दिवशी धनेरी पंजेरी चा प्रसाद केला जातो सकाळी ७ ते ९ महाभिषेक करुण दुपारी प्रवचनाचा  कार्यक्रम होतो हा उत्सव पर पाडण्या साठी उत्सव समिति स्थापन करण्यात आली आहे त्यात नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर,प्रविण पहिलवान,सुहास घाटकर, प्रभाकर झळके ,दयानेश्वर नागपुरे,  राजेश नागपुरे,जयंत नागपुरे,नारायण घाटकर,मुरलीधर नागपुरे,सुनील नागपुरे,सचिन नागपुरे आदि परिश्रम घेत आहे 


Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity