ताज्या घडामोडी :
Home » » अनकाई किल्यावरील तळ्यात बुडुन कासारखेडे येथील युवकाचा मृत्यु

अनकाई किल्यावरील तळ्यात बुडुन कासारखेडे येथील युवकाचा मृत्यु

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on मंगळवार, १५ ऑगस्ट, २०१७ | मंगळवार, ऑगस्ट १५, २०१७

 अनकाई किल्यावरील तळ्यात बुडुन कासारखेडे येथील युवकाचा मृत्यु

येवला । तालुक्यातील कासारखेडे येथील युवक योगेश गायकवाड (वय २१) हा अनकाई किल्यावरील तळ्यात पोहत असतांना तळ्यातील गाळात अडकुन त्याचा मृत्यु झाला.
शेवटचा श्रावणी सोमवार असल्याने योगेश गायकवाड हा त्याचे मित्रासमवेत अनकाई येथील किल्यावर यात्रेसाठी गेला होता.  दरम्यान योगेश हा किल्यावरील तळ्यात पोहोत असतांना तळ्यातील गाळात पाय अडकल्याने त्याचा पाण्यात बुडुन मृत्यु झाला.  सदर घटने बाबत येवला तालुका पोलीस ठाण्यात आकसत मृत्युची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक तपास तालुका पोलीस ठाण्याचे सहा.पो.उपनिरीक्षक एस.के. निकम हे करीत आहे.  योगेश हा कासारखेडे येथील साहेबराव गायकवाड यांचा चिरंजीव असुन त्याच्या मागे आई, वडील, मोठा भाऊ बहीण, असा परीवार आहे.  योगेशच्या निधनाने गावपरिसरात शोककळा पसरली आहे. 

Share this article :
मित्रानो ….
गेले सहा वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity