ताज्या घडामोडी :

.

.
Home » » बाभूळगाव केंद्रावर दिड हजार विद्यार्थ्यांची बारावीची आसनव्यवस्था पाटोदा,बाभूळगाव,एरंडगावसह येवल्यातील विध्यार्थी देणार परीक्षा

बाभूळगाव केंद्रावर दिड हजार विद्यार्थ्यांची बारावीची आसनव्यवस्था पाटोदा,बाभूळगाव,एरंडगावसह येवल्यातील विध्यार्थी देणार परीक्षा

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, १७ फेब्रुवारी, २०१८ | शनिवार, फेब्रुवारी १७, २०१८

बाभूळगाव केंद्रावर दिड हजार विद्यार्थ्यांची बारावीची आसनव्यवस्था

पाटोदा,बाभूळगाव,एरंडगावसह येवल्यातील विध्यार्थी देणार परीक्षा

 

येवला  : प्रतिनिधी
महाराष्ट् राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणा-या बारावी परीक्षेची केंद्र क्रमाक ०२११ वरील आसन व्यवस्था जाहीर करण्यात आली आहे.बाभुळगाव येथील संतोष श्रमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय या केंद्रावर बाभुळगावसह,पाटोदा,एरंडगाव,भाटगाव व येवल्यातील सुमारे एक हजार ५००  विद्यार्थ्यांची आसनव्यवस्था करण्यात आली आहे,अशी माहिती केंद्र संचालक जी.एस.येवले यांनी दिली.

बाभुळगाव येथील संतोष श्रमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालययाच्या केंद्रावर विज्ञान शाखेचे एस ०१४१७५ ते एस ०१४९३६ हे आसन क्रमांक, कला शाखेचे एस ८१३९३ ते एस ८१९०२ आणि वाणिज्य शाखेतील एस १४९२८९  ते एस १४९३५० या आसन क्रमाकांची सर्व विषयांची आसनव्यव्यस्था असणार आहे. बाभुळगाव येथील संतोष श्रमिक,येवला येथील जनता विद्यालय व एस.एस.डी.महाविद्यालय,एरंडगाव येथील स्वामी विवेकानंद,पाटोदा येथील जनता विद्यालय,भाटगाव येथील विश्वलता महाविद्यालय,जळगाव नेऊर येथील संतोष कनिष्ठ महाविद्यालय येथील विधार्थी या केंद्रावर परीक्षा देणार आहे.

इंग्रजी,मराठी व भूगोल विषयासाठी दोन कम्पस मध्ये तर इतर सर्व विषयांची परीक्षा एकाच कम्पस मध्ये होणार आहे. बुधवारी होणाऱ्या इंग्रजीच्या आणि शुक्रवारी होणाऱ्या मराठीच्या पेपरला संतोष श्रमिक व शेजारील एसएनडी इंग्लिस मेडियमच्या इमारतीत आसनव्यवस्था केलेली आहे.परीक्षार्थींनी सकाळ सत्राच्या परीक्षेसाठी सकाळी दहा तर दुपारच्या सत्रातील परीक्षेसाठी दोन वाजता हजर रहावे.बदलत्या नियमानुसार एक मिनिट उशीर झाला तरी प्रवेश दिला जाणार नाही. बदललेली आसनव्यवस्था दररोज विद्यालयातील फलकावर लिहिलेली असणार आहे.परीक्षा परिसरात भ्रमणध्वनी,पेजर,साधने,कापीस उपयुक्त मजकूर आणू नये.कॉपी विरहित परीक्षा घेतली जाणार आहे, परीक्षा कडक पोलिस बंदोबस्तात होणार आहे. अनधिकृत व्यक्तिंना परीक्षा परीसरात आणि परीक्षेपासून दोनशे मीटर परीसरात कायद्यानुसार बंदी असणार आहे. दक्षता समिती केंद्रावर कार्यरत राहणार आहे, अशी माहिती अशी माहिती केंद्रसंचालक येवले यांनी दिली.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity