ताज्या घडामोडी :

.

.
Home » » सरपंच सेवा (संघटना) संघ महाराष्ट्र राज्याचे सोशल मिडीया नेटवर्क संपर्क प्रमुख पदी साताळीचे सरपंच भाऊसाहेब कळसकर यांची बिनविरोध निवड.

सरपंच सेवा (संघटना) संघ महाराष्ट्र राज्याचे सोशल मिडीया नेटवर्क संपर्क प्रमुख पदी साताळीचे सरपंच भाऊसाहेब कळसकर यांची बिनविरोध निवड.

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शनिवार, २५ ऑगस्ट, २०१८ | शनिवार, ऑगस्ट २५, २०१८

सरपंच सेवा (संघटना) संघ महाराष्ट्र राज्याचे सोशल मिडीया नेटवर्क संपर्क प्रमुख पदी  साताळीचे सरपंच भाऊसाहेब कळसकर यांची बिनविरोध निवड.

येवला : प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य सरपंच सेवा संघाची (सरपंच संघटना) नोंदणीकृत संघटना जानेवारी २०१८ मध्ये स्थापन झाली असुन संघटनेचे राज्याध्यक्ष पुरूषोत्तमजी घोगरे व राज्य सरचिटणीस बाबासाहेब पावसे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर सरपंचाचे न्याय्य हक्क व मागणीसाठी संघटनेचे कामकाज सुरू आहे
 सरपंच संघटनेचे राज्याध्यक्ष पुरूषोत्तम घोगरे पाटील व राज्य सरचिटणीस बाबासाहेब पावसे यांनी सरपंच सेवा संघाचे महाराष्ट्र राज्य सोशल मिडीया नेटवर्क प्रमुख पदी येवला तालुका राष्ट्रवादी काॅंग्रेसचे युवा नेते तथा साताळी गावचेे एक अभ्यासु,उपक्रमशिल नेतृत्व सर्वांना सोबत घेऊन चालणारे लेकीचे झाड या उपक्रमाचे संकल्पक ,आदर्श सरपंच भाऊसाहेब कळसकर यांची यांची एकमताने नियुक्ती केली आहे
 यावेळी राज्यातील सर्व सरपंचांची सोशल मिडीया नेटवर्कच्या माध्यमातुन एकजुट करत सर्वांना सोबत घेऊन सरपंचांना ग्रामविकासात कामकाज करतांनी सरपंचाना न्याय्य हक्क व मागणीसाठी राज्यभरातील सरपंचांना येणा-या अडी अडचणी सोडविण्यात येईल असे सोशल मिडीया नेटवर्क संपर्क प्रमुख भाऊसाहेब कळसकर यांनी सांगीतले
  गेले तीन महीण्यापुर्वीच त्यांची सरपंच संघटनेच्या येवला तालुकाध्यक्षपदी नियुक्ति झाली होती व आज पुन्हा सरपंच संघटनेच्या राज्याच्या सोशल मिडीया नेटवर्क संपर्क संपर्क प्रमुख पदी निवड झाल्याने महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबळ साहेब,आमदार नरेंद्र दराडे,आमदार किशोरभाऊ दराडे,जेष्ट सहकार नेते अंबादास बनकर,राष्ट्रवादी काॅंग्रेस प्रदेश सरचिटणीस माणिकभाऊ शिंदे,शिवसेना नेते संभाजीराजे पवार,येवला पंचायत समिती सभापती नम्रता जगताप,उपसभापती रूपचंद भागवत,गटविकास अधिकारी सुनिल अहिरे,सरपंच संघटनेचे नाशिक जिल्हाध्यक्ष बाळासाहेब म्हस्के,जिल्हा सरचिटणीस प्रसाद पाटील,येवला तालुका राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष वसंत पवार, किसान सभेचे तालुकाध्यक्ष तुळशीराम कोकाटे,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्ताजी काळे,जि प सदस्य संजय बनकर,छगन आहेर,जऊळकेचे सरपंच शालीनी वाळके,निमगावचे सरपंच नवनाथ लभडे,कोळमचे सरपंच पारसनाथ चव्हाण,देवळानेचे सरपंच आम्रपाली जाधव,महालखेड्याचे सरपंच राजुबाई गाडे,चिचोंडी बु सरपंच रविंद्र गुंजाळ,चिचोंडी खु चे सरपंच संतोष मढवई यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity