ताज्या घडामोडी :
Home » » भागवत बंधूूचे वतीने अत्यंत गरीब व गरजू अशा पाच मुलांना सायकलचे वाटप

भागवत बंधूूचे वतीने अत्यंत गरीब व गरजू अशा पाच मुलांना सायकलचे वाटप

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, १५ ऑगस्ट, २०१८ | बुधवार, ऑगस्ट १५, २०१८


भागवत बंधूूचे वतीने अत्यंत गरीब व गरजू अशा पाच मुलांना सायकलचे वाटप 


येवला तालुक्यातील खरवंडी या अतिदुर्गम भागातील सरस्वती विद्यालय खरवंडी येथे नारायणगिरीजी महाराज फाऊंडेशन नाशिक तर्फे उद्योजक विष्णूभाऊ भागवत व शिवसेना उपसभापती रुपचंदभाऊ भागवत यांचे वतीने अत्यंत गरीब व गरजू अशा पाच मुलांना सायकलचे वाटप आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी करण्यात आले. खरवंडी हे गाव येवला तालुक्यातील अवघड क्षेत्रात येते. शाळेत परिसरातील ६ ते ७ किमी वरून विद्यार्थी येतात. पालकांची मुलांना शिकवण्याची प्रबळ ईच्छा परंतु शाळेपासून दूर डोंगराळ भागात राहणारी भूमिहीन कुटुंबातील हि मुले शाळेत येण्यासाठी कधीकधी टाळाटाळ करतात. त्यांना जर येण्याजण्याची व्यवस्था झाली तर हि मुले दररोज हजर राहतील. शाळेचे मुख्याध्यापक गोरख कुळधर यांनी हि बाब ग्रामस्थांच्या लक्षात आणून दिली. त्यातीलच सामाजिक कामाची आवड असणारे खरवंडीचे पोलीस पाटील यांनी ताबडतोब विष्णूभाऊ भागवत व शिवसेना उपसभापती रुपचंदभाऊ भागवत यांना संपर्क करून सत्य परिस्थिती सांगितली. नारायणगिरी महाराज फाऊंडेशन नाशिक तर्फे लगेच या पाच विद्यार्थ्यांना नव्या सायकली देऊ केल्या. १५ ऑगस्ट रोजी शिवसेना येवला तालुक्याचे उपसभापती रुपचंदभाऊ भागवत यांचेसह नारायणगिरी फाऊंडेशन चे देविदास जानराव सर, पत्रकार एकनाथ भालेराव, विलास भागवत सर, मणियार साहेब, राजेंद्र तायडे, ज्ञानेश्वर भागवत, पप्पूभाऊ जानराव सायकली घेऊन आले व या सायकली गीता विष्णू ठाकरे, कावेरी नवनाथ खंडागळे, ऋतेश बाळासाहेब गरुड, समाधान भागीनाथ खंडागळे, दीपक आण्णा सूर्यवंशी या विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आल्या. या पाच मुलांपैकी २ मुली व ३ मुले आहेत त्यातील दोन विद्यार्थ्यांना आईवडील नाही. तर तिघे अतिशय गरीब कुटुंबातील आहे. यावेळी शिवसेनेचे रामलाल फरताळे, रमेश फरताळे,  गोरख कुळधर (मुख्याधपक), किशोर झाल्टे, दशरथ मोरे, योगेश उशीर, बाबासाहेब आहेर, भाऊसाहेब आहेर, वसंत मोरे, भागीनाथ मोरे, रामनाथ झाल्टे, ज्ञानेश्वर घायवट, विठ्ठल मोरे, दीपक सोमासे, बाळासाहेब गरुड, दिगम्बर आहेर, मछिंद्र पानसरे, गोरख मोरे, दत्तात्रय जेजुरकर, रामेश्वर कुळधर, संजय जेजुरकर, विनोद कुळधर सह आदी ग्रामस्थ व विद्यार्थी हजर होते.

Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity