ताज्या घडामोडी :
Home » » महाराष्ट्र चर्मकार उठाव संघ महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी निर्मला थोरात

महाराष्ट्र चर्मकार उठाव संघ महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी निर्मला थोरात

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१८ | गुरुवार, ऑगस्ट २३, २०१८


महाराष्ट्र चर्मकार उठाव संघ महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी निर्मला थोरात
येवला - प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य चर्मकार उठाव संघच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या नेत्या निर्मला गणपत थोरात यांची निवड करण्यात आली आहे. चर्मकार उठाव संघाचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव कानडे यांनी थोरात यांना नियुक्तीपत्र दिले. यावेळी सचिव विजय हासे, राज्य उपाध्यक्ष गोकुळदास वाघ उपस्थित होते.
निर्मला थोरात या येवला शहर व तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या सक्रीय कार्यकर्त्या असून येवला तालुका दक्षता व पुरवठा समिती तसेच समन्वय आणि पुर्रविलोकन समिती सदस्य म्हणून कामकाज पाहिले आहे. थोरात यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे. जिल्ह्यातील चर्मकार महिलांमध्ये संपर्क साधुन जागृती करणे तसेच बचत गटासारख्या सबलीकरणाच्या योजना राबविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे थोरात यांनी यावेळी सांगितले.

Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity