ताज्या घडामोडी :

.

.
Home » » संत बाहिणा बाई महाराज याचा फिरता नारळी सप्ताहात पाचव्या दिवशी ह भ प मच्छिद्र महाराज भोसले नेवासा याचे कीर्तन

संत बाहिणा बाई महाराज याचा फिरता नारळी सप्ताहात पाचव्या दिवशी ह भ प मच्छिद्र महाराज भोसले नेवासा याचे कीर्तन

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, २३ ऑगस्ट, २०१८ | गुरुवार, ऑगस्ट २३, २०१८ममदापुर  :- येवला तालुक्यातील देवदरी येथे संत बाहिणा बाई महाराज याचा फिरता नारळी सप्ताहात पाचव्या दिवशी ह भ प  मच्छिद्र महाराज भोसले नेवासा याचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. भागवत संप्रदायातील पताका खर्या अर्थाने बाहिणा बाई महाराज यानी फडकवली आहे. संताचे अभंग म्हणजे सर्व सामान्यासाठी अमृत असुन थोर संत महात्माचे दर्शन झाले तरी देखील उद्धार होत आसतो . मी तुम्हाला उपदेश करण्यासाठी येथे उभा नसुन जगतगुरू तुकाराम महाराज याचा तो अधिकार असुन ते खरे समाज सुधारक संत होऊन गेले. त्यानी समाज सुधारक म्हणून मोलाचा वाटा आहे स्वत करून दाखवले. त्यानी सर्व समाज घडवण्यासाठी वाहुन घेतले स्वतःच्या पत्नी चा शेतीचा किंवा कुठलाही विचार न करता आमोल ठेवा ऊपलब्ध करून ठेवला तरी पण महाराज एका अभंगात म्हणतात  " मज पामराशी काय थोरपण पाईची वहान पाई बरी  " त्यामुळे संतांचे अभंग म्हणजे हे संताचे अतंकरण आहे. संत हे भक्तांचे अंतकारण ओळखतात म्हणून तर भगवान  श्रीकृष्णाने गीता सागण्यासाठी अर्जूनाची निवड केली.  आणि म्हणूनच कीर्तनात वक्ता जसा महत्त्वाचा आहे तसा श्रोता देखील महत्वाचा आहे.
💥सप्ताह साठी परिसरातील राजापूर ममदापुर खरवंडी देवदरी भागातील लोकानी सप्ताह साठी  देणगी जमा केली परतु कार्यक्रमाचे विशाल रूप पहाता कमिटी ने 61 क्विंटल साखरेचा प्रसाद शेवटच्या दिवशी बनविणार आहे सदर साखरेसाठी  देणगी देणगी साठी व्हाटस अप वर पोस्ट टाकली ती बघून भगवान मच्छिद्र गुडघे या भावीकने एक्कावन हजार रुपये ची साखर स्वखर्चाने पोहच केली . आशा प्रकारे परिसरातुन मदतीचा ओघ सुरू आहे. या प्रसंगी बाहिणा बाई महाराज संस्थान चे अध्यक्ष मधुसुधन महाराज मोगल ,बाळासाहेब दाणे , भास्कर दाणे, शाताराम आहेर , संपत आहेर, बाळासाहेब थोरात, तात्यासाहेब दाणे , गोपिनाथ दाणे, मच्छिद्र गुडघे, काशीनाथ थेटे , नंदू दाणे, सयाजी गुडघे, ज्ञानेश्वर काळे, रामहारी दाणे, भानदास दाणे, धर्मा दाणे, किशोर  झाल्टे, रामभाऊ झाल्टे, विठ्ठल मोरे,नानासाहेब आहेर , शंकर दाणे याच्या सह मोठ्या संख्येने ग्रामस्थ हजर होते.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity