ताज्या घडामोडी :

.

.
Home » » "विश्वलता महाविद्यालयात ७२ वा स्वांतत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा"

"विश्वलता महाविद्यालयात ७२ वा स्वांतत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा"

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, १६ ऑगस्ट, २०१८ | गुरुवार, ऑगस्ट १६, २०१८





"विश्वलता महाविद्यालयात ७२ वा स्वांतत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा"

येवला  : प्रतिनिधी
      बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो भारताचा ७२ वा स्वातंत्र्यदिन श्री.साईराज शिक्षण प्रतिष्ठान संचलित विश्वलता कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.विविधतेत एकता अशी भारत देशाची अखिल विश्वात ख्याती सर्वश्रुतच आहे.या स्वांतत्र्य दिनासाठी प्रमुख अतिथी म्हणून माजी सैनिक मेजर श्री.तुकाराम डोईफोडे, संस्थेचे सचिव मा. श्री. प्रशांत भंडारे, विश्वस्त श्री. भूषण लाघवें, महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. डी. के. कदम  सर्व  प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

      सर्वप्रथम ध्वजवंदन केल्यानंतर मेजर तुकारामजी डोईफोडे यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रगीत झाले. महाविद्यालयाचे प्राचार्य डी.के. कदम सर यांनी अध्यक्ष स्थान स्वीकारले. महाविद्यालयीन युवतींना ध्वजगीत प्रस्तुत करून उपस्थितांची वाहवा मिळाली. 

      यानंतर उपस्थित विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना हक्काचे स्वतंत्र्य व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने सर्वसमावेशक व सद्यस्थितीवर मार्मिक भाष्य, अंतर्मुख करना-या विषयावर वादविवाद घडवून आणला. यात सोशल मीडिया त्याचे फायदे व तोटे, आजची भरकटणारी तरुणाई अशा विषयाचा अंतर्भाव करण्यात आला.यामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी आपली मते दिलखुलासपणे मांडली त्यात उपस्थितांची मनसोक्त साथ मिळाली. 

       त्यानंतर प्रमुख पाहुणे मेजर तुकारामजी डोईफोडे यांनी आपल्या भावना उपस्थितांसमोर व्यक्त करतांना तरुणानी सैन्यात मोठ्या प्रमाणात भरती होऊन देशसेवेचे विडा उचलावा असे आवाहनही केले. या सर्वप्रसंगी वातावरण धीर गंभीर झालेले व त्याचप्रमाणे हे सर्व कथन करतांना मेजारांचा उर भरून आला व डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. 

        त्यानंतर संस्थेचे सचिव श्री प्रशांत भंडारे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या या कार्यक्रमाप्रसंगी आपले विचार प्रकट करताना मेजर डोईफोडे यांच्याशी चर्चेतून आलेली खंत ती अशी कि आजपर्यंत माझ्यासारखा निवृत्त सैनिकाला ध्वजारोहणासाठी कधीही पाचारण करण्यात आले नाही.परंतु आपल्या संस्थेने हा मान देऊन गौरवान्वित केल्याची भावना खूप काही सांगून गेली होती. 

      त्यानंतर संस्थेचे विश्वस्त श्री.भूषण लाघवें यांनी सर्वप्रथम सर्व उपस्थितांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देऊन स्वातंत्र्याचे रूपांतर स्वैराचारात न करण्याच्या मार्मिक व लक्षवेधी सल्ला दिला. 

        अध्यक्षीय भाषणात मा.कदम यांनी स्वातंत्र्याचा मनमुराद आनंद घेत असताना कर्तव्याचा विसर कुठेही पडू नये असे सांगितले. 

        या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओघवत्या स्वरात प्राध्यापिका छाया भागवत यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.बाबासाहेब गायकवाड यांनी केले. या सर्व कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक समितीतील प्रा.विजय मढवई ,व्ही.पी.प्रा.घोरपडे तसेच संस्थेतील प्रत्येक लहान मोठ्या घटकांनी योगदान देत कार्यक्रम स्मरणीय बनवला. 



Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity