शिका । संघटीत व्हा ।।समतेसाठी संघर्ष करा ।।।या ब्रिद वाक्याने प्रेरित होवुन डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह व शिक्षण मंडळ येवला संचलित सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय सोमठाण देश ता.येवला येथे ७२ वा स्वातंत्र्य दिवस अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संस्था अध्यक्ष श्री प्रा.एस.व्ही.निकुंभ सर होते. ध्वज पुजन ग्रामपंचायत सरपंच श्री.बबनराव हारळे,संस्था संचालक श्री नंदकुमार गायकवाड सर,श्री राजेंद्र भावसार यांनी केले तर ध्वजारोहण सोसायटी चेनवनिर्वाचित चेअरमन श्री रतनसो कदम यांनी केले यावेळी शालेय गित मंचने राष्ट्रगीत, ध्वज गीत,देशभक्ती पर गीत सादर केले प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापक श्री माणिक मढवई यांनी केले प्रमुख पाहुणे यांचा सत्कार करण्यात आला सुत्रसंचालन विद्यार्थी अक्षय कुमार पिंपळे याने केले ज्योती जाधव, मित्रशिला पगारे,सुरेखा पगारे, पांडुरंग इंगळे यांनी भाषण केले आभार श्री. जाधव एस.बी.यांनी मानले. कार्यक्रमासाठी भाऊसाहेब घनघाव ,बाळासाहेब कदम, रंगनाथ पा.ढगे, सुधाकर पगारे, सोमनाथ पा.ढगे, रतन पा.कुंदे,नवनाथ घनघाव, अँड.उत्तमराव कदम, विठ्ठलराव पिंपळे, शंकरराव पा.घनघाव, आदी मान्य वर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी प्रयत्न केले
Home »
» सोमठाण देश विद्यालयात१५आँगष्ट उत्साहात साजरा.
सोमठाण देश विद्यालयात१५आँगष्ट उत्साहात साजरा.
Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, १५ ऑगस्ट, २०१८ | बुधवार, ऑगस्ट १५, २०१८
सोमठाण देश विद्यालयात१५आँगष्ट उत्साहात साजरा.