ताज्या घडामोडी :

.

.
Home » » शिवसेनेच्या जिल्हा समन्वयकपदी कुणाल दराडे यांची नियुक्ती येवला,निफाड,चांदवड या तालुक्यांची सोपवली जवाबदारी

शिवसेनेच्या जिल्हा समन्वयकपदी कुणाल दराडे यांची नियुक्ती येवला,निफाड,चांदवड या तालुक्यांची सोपवली जवाबदारी

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शुक्रवार, २८ सप्टेंबर, २०१८ | शुक्रवार, सप्टेंबर २८, २०१८शिवसेनेच्या जिल्हा समन्वयकपदी कुणाल दराडे यांची नियुक्ती

येवला,निफाड,चांदवड या तालुक्यांची सोपवली जवाबदारी

 


येवला : प्रतिनिधी

 ग्रामीण भागात शिवसेनेत ज्येष्ठांसह अनेक तरुणही सक्रिय आहेत.या सर्वांना विश्वासात घेऊन दिंडोरी मतदारसंघात आगामी निवडणुकीसाठी कृतीशील कार्यक्रम राबवून प्रभावी संघटन करण्यावर भर दिला जाईल, अशी माहिती जिल्हा समन्वयक कुणाल दराडे यांनी दिली.

येथील शिवसेनेचे युवा नेते कुणाल दराडे यांची जिल्हा समन्वयक पदी नियुक्ती झाली आहे. गुरुवारी मुंबईतून शिवसेना कार्यालयातून ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील येवला,निफाड,चाडवड या तालुक्यांची जवाबदारी सोपविण्यात आली आहे. कुणाल दराडे हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार नरेंद्र दराडे यांचे चिरंजीव असून संतोष जनसेवा मित्रमंडळाच्या माध्यमातून मागील सात-आठ वर्षांपासून ते तालुक्यातील समाजकारणात सक्रिय आहेत.जिल्हा परिषदेच्या राजापूर गटातील आईच्या निवडणुकीची संपूर्ण जबाबदारिसह विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य व शिक्षक मतदारसंघाची जवाबदारी पेलून त्यांनी आपली चुणूक दाखविली आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच सेना नेते संजय राऊत यांनी देखील दराडे यांच्या कामाचे कौतुक केले आहे.

या तिनही तालुक्यांमध्ये सर्व पदाधिकाऱ्यांसह निष्ठावंतांना सोबत घेऊन निवडणुकांसाठी अनुकूल असलेले वातावरण अजूनच बेरजेचे करण्यासाठी काम करणार असल्याचे दराडे यांनी सांगितले.या निवडीबद्दल आमदार किशोर दराडे,शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख संभाजीराजे पवार,उपनगराध्यक्ष सुरज पटणी,तालुकाप्रमुख रतन बोरणारे,शहर प्रमुख राजेंद्र लोणारी,पजिल्हा प्रमुख भास्कर कोंढरे,उपसभापती रूपचंद्र भागवत,वाल्मिक गोरे,खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दिनेश आव्हाड,पंचायत समिती सदस्य प्रविण गायकवाड,नितीन काबरा,संजय कासार,धीरज परदेशी,महेश सरोदे,दीपक भदाणे,राहुल लोणारी,युवासेना तालुकाप्रमुख प्रजव्ल पटेल,शहरप्रमुख लक्षण गवळी,अमोल सोनवणे,झुंझार देशमुख,मकरंद तक्ते,विजय गोसावी आदींनी अभिनंदन केले आहे.

 


 
 
 


Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity