ताज्या घडामोडी :
Home » » कुसूर व अंगुलगाव येथील विद्युत उपकेंद्र भुजबळ साहेबांच्या प्रयत्नांमुळे मंजूर भुजबळ साहेबांनी केलेल्या विकासकामांचे श्रेय घेऊ नये - वसंत पवार

कुसूर व अंगुलगाव येथील विद्युत उपकेंद्र भुजबळ साहेबांच्या प्रयत्नांमुळे मंजूर भुजबळ साहेबांनी केलेल्या विकासकामांचे श्रेय घेऊ नये - वसंत पवार

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on रविवार, ९ सप्टेंबर, २०१८ | रविवार, सप्टेंबर ०९, २०१८





कुसूर व अंगुलगाव येथील विद्युत उपकेंद्र भुजबळ साहेबांच्या प्रयत्नांमुळे मंजूर

भुजबळ साहेबांनी केलेल्या विकासकामांचे श्रेय घेऊ नये
- वसंत पवार


येवला :- प्रतिनिधी

 येवला तालुक्यातील कुसूर, अंगुलगाव  या ठिकाणी ५ एमव्हीएचे नवीन विद्युत उपकेंद्र मंजूर करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ साहेब यांनी सातत्याने राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे  पाठपुरावा करून हे दोन्ही उपकेंद्रे याआधीच मंजूर करून घेतली आहे. मात्र छगन भुजबळ साहेबांनी यांनी मंजूर करून घेतलेल्या कामाचे श्रेय लाटण्यासाठी ती कामे आम्ही मंजूर केली अशा बातम्या विरोधकांनी पेरून जनतेची दिशाभूल करण्याचा आणि न कलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा केवीलवाणा प्रयत्न सद्या येवला मतदार संघात सुरु असल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे विधानसभा अध्यक्ष वंसत पवार यांनी केली आहे.


त्यांनी म्हटले आहे की, येवला तालुक्यातील कुसूर, अंगुलगाव या परिसरात वारंवार विद्युतपुरवठा खंडित होणे, कमी दाबाने विद्युत पुरवठा असणे याबरोबरच इतर अनेक प्रश्नांचा परिसरातील शेतकऱ्यांना सामना करावा लागत होता. या परिसरात अखंड वीजपुरवठा होत नसल्याने पिकांना वेळेवर पाणी देता येत नव्हते. कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्यामुळे ट्रान्सफार्मर व विद्युत पंप निकामी होण्याचे प्रमाणही या भागात अधिक आहे.  त्यामुळे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ साहेब यांनी शेतकऱ्यांना सुरळीत विद्युत पुरवठा होण्यासाठी दि.९ फेब्रुवारी २०१५ रोजी दिन दयाळ उपाध्याय ग्राम ज्योत योजना व आय.पी.डी.एस (इन्फ्रा -३) च्या डी.पी.आर.मध्ये कुसूर व अंगुलगाव या ३३/ ११ केव्ही नवीन सबस्टेशन चा समावेश करण्याची ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे पत्राद्वारे शिफारस केलेली होती. त्याचप्रमाणे सातत्याने पत्रव्यवहार करून आणि विधानमंडळ अधिवेशनात सुद्धा दि.१९ मार्च २०१८ रोजी कपात सुचनेद्वारे या विद्युत उपकेंद्रांचा भुजबळ साहेबांनी पाठपुरावा केलेला आहे. त्यामुळे ऊर्जा मंत्र्यांनी सदर उपकेंद्राचा डीपीआरमध्ये समावेश करून या उपकेंद्रांना मंजुरी दिलेली होती. 

सदर काम लवकरात लवकर सुरु करण्यात यावे यासाठी २८ जुलै २०१८ रोजी भुजबळ साहेबांनी ऊर्जा मंत्र्यांकडे पत्राद्वारे पाठपुरावा केला आहे. त्यामुळे हे काम आता लवकरच सुरु होणार असल्याने मतदारसंघातील विरोधकांकडून भुजबळ साहेबांकडून केलेल्या कामांचे श्रेय लाटण्याचा प्रकार केला जात आहे. निवेदन देतांनाचा फोटो काढून कुसूर व अंगुलगाव विद्युत उपकेंद्र मार्गी लावल्याचा देखावा विरोधकांकडून केला जात असल्याचे वसंत पवार यांनी म्हटले आहे.


Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity