ताज्या घडामोडी :

.

.
Home » » येवल्यातील शिष्ट मंडळ दिल्लीच्या वस्त्रोद्योग मंत्रालयात... केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री ना. अजय टमटा यांची भेट कार्यवाहीचे आश्वासन

येवल्यातील शिष्ट मंडळ दिल्लीच्या वस्त्रोद्योग मंत्रालयात... केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री ना. अजय टमटा यांची भेट कार्यवाहीचे आश्वासन

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on सोमवार, १७ सप्टेंबर, २०१८ | सोमवार, सप्टेंबर १७, २०१८


येवल्यातील शिष्ट मंडळ दिल्लीच्या वस्त्रोद्योग मंत्रालयात...केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री ना.अजय टमटा यांची भेट कार्यवाहीचे आश्वासन !

 

येवला : प्रतिनिधी

जगप्रसिद्ध असलेल्या येवल्याच्या पैठणी हातमाग विणकराच्या विविध समस्या सोडवण्याकामी  दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली येवला शहराध्यक्ष आनंद शिंदे यांनी केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री अजय टमटा यांना दिल्लीत भेटून विणकराच्या विविध प्रश्नासंदर्भात चर्चा करून निवेदन दिले. 

येवल्याची जगप्रसिद्ध पैठणी सध्या समस्याच्या भोवऱ्यात सापडली असल्याचे गाऱ्हाणे मांडल्यानंतर ना. अजय टमटा यांनी या कामी लक्ष घालण्याचे आश्वासन देऊन, वस्त्रोद्योग मंत्रालयातील संबधित अधिकाऱ्याची लवकरच बैठक घेऊन समस्या मार्गी लावण्याचे सुतोवाच केले. शिष्ट मंडळात भाजप शहराध्यक्ष आनंद शिंदे, संजय सोमासे, श्रीकांत खंदारे आदि उपस्थित होते.

सोळाव्या शतका पूर्वीचा इतिहास असलेल्या या महावस्त्राला युनेस्को ने वर्ल्ड हेरीटेज आयकॉन देऊन जागतिक स्तरावर ओळख निर्माण करून दिली होती. नाशिक जिल्ह्यातील येवला शहरासह तालुक्यात नागडे, बल्हेगाव, गणेशपूर, वडगाव, यासह विविध गावात सुमारे 3500 हातमाग आहे. या विणकरांचे संपूर्ण कुटुंबाचे उदरनिर्वाह या व्यवसायावर अवलंबून आहे, परंतु या व्यवसायातून आवश्यक तेवढा फायदा मिळत नसल्याने विणकर बांधव त्यांच्या मुलांना व्यवस्थित शिक्षण व इतर सुविधा पुरविण्यास असमर्थ आहेत. विणकराना पैठणी साडी तयार करण्यासाठी लागणाऱ्या रेशीमच्या किमती वाढल्या असून व्यापारी त्या नुसार भाव देत नसल्याने हा व्यवसाय गर्तेत सापडला आहे. यासह अनेक समस्येअभावी जवळपास 30 ते 35 टक्के हातमाग बंद अवस्थेत आहे. विविध समस्यामुळे सध्याच्या परिस्थितीत हातमाग विणकरांची नवीन पिढी हा व्यवसाय करण्यास तयार नाही. त्यामुळे या व्यवसायाला उर्जितावस्था आणण्यासाठी केंद्र शासनाने सवलतीचा व मदतीचा हात देण्याची गरज असल्याचे शिष्ट मंडळाने ना. अजय टमटा यांच्या लक्षात आणून दिले. 

या विणकरानी दिलेल्या मागणीच्या निवेदनात म्हटले आहे शहरात रेशीम बँक स्थापन करावी, जेणेकरून विनकाराना कर्जाप्रमाणे रेशीम मिळेल व काही अंशी व्यवसायाला उर्जितावस्था प्राप्त करता येईल तसेच विणकर बांधवासाठी असलेल्या विविध योजनेची माहिती मिळावी यासाठी वस्त्रोद्योग विभागाने एक कार्यालय उघडावे. विनकरासाठी घरकुल योजना सुरु करावी, हातमाग विणकरांना आरोग्य विमा लागू करावा, विणकराच्या मुलांना शिक्षणात सवलती मिळाव्या,  विणकरांसाठी पेंशन योजना सुरु करावी, शासनाने  विणकरांसाठी संयुक्त वर्क शेड उभारून तेथे 30 ते 40 विणकरांना एकाच ठिकाणी काम करण्यासाठी प्रोत्साहित करावे,  विणकरांना कमी दराने वीजपुरवठा करावा, रेशीम हातमाग व्यवसायाचे आधुनिकीकरण करण्यासाठी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत नवीन तंत्रज्ञान शिकण्यासाठी विणकराना प्रशिक्षण द्यावे, अश्या मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहे.

===================================================

फोटो कॅप्शन - 

विणकरांच्या विविध मागण्याबाबत केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री अजय टमटा यांना निवेदन देताना येवल्यातील भाजप शहराध्यक्ष आनंद शिंदे समवेत संजय सोमासे, श्रीकांत खंदारे 


Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity