ताज्या घडामोडी :
Home » » कोऱ्या कागदाचा रिम लाचेच्या स्वरूपात मागणाऱ्या भूमिअभिलेख कर्मचाऱ्या लाच लुचपत विभागाच्या पथकाने केली अटक

कोऱ्या कागदाचा रिम लाचेच्या स्वरूपात मागणाऱ्या भूमिअभिलेख कर्मचाऱ्या लाच लुचपत विभागाच्या पथकाने केली अटक

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on शुक्रवार, २१ सप्टेंबर, २०१८ | शुक्रवार, सप्टेंबर २१, २०१८


कोऱ्या कागदाचा रिम लाचेच्या स्वरूपात मागणाऱ्या  भूमिअभिलेख  कर्मचाऱ्या लाच लुचपत विभागाच्या पथकाने केली अटक 

येवला : प्रतिनिधी 

मालमत्ता उतारा देण्यासाठी कोऱ्या कागदाचा रिम लाचेच्या स्वरूपात मागणाऱ्या येवला भूमिअभिलेख कार्यालयातील निमतानदार यास नाशिक लाच लुचपत विभागाच्या पथकाने अटक केली. 

येवला भूमिअभिलेख कार्यालयातील निमतानदार मुरलीधर शंकर ठाकरे याने मालमत्ता उतारा देण्यासाठी तक्रारदार यांचे कडे शासकीय फी व्यतिरिक्त १८० रुपये अथवा एक कोऱ्या कागदाचा रिम लाचेच्या स्वरूपात मागणी केले म्हणून तक्रारदारयांनी नाशिक लाच लुचपत विभागात तक्रार केली होती.  त्यानुसार शुक्रवारी येवला भूमिअभिलेख कार्यालयात  कोऱ्या कागदाचा एक रिम स्वीकारताना लाच लुचपत विभागाने सापळा रचून ठाकरे यांना रंगेहाथ पकडले. 


Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity