ताज्या घडामोडी :
Home » » येवला तालुका शासकीय क्रिडा स्पर्धेत तीन हजारावर खेळाडुंचा सहभाग

येवला तालुका शासकीय क्रिडा स्पर्धेत तीन हजारावर खेळाडुंचा सहभाग

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, २७ सप्टेंबर, २०१८ | गुरुवार, सप्टेंबर २७, २०१८



येवला तालुका शासकीय क्रिडा स्पर्धेत तीन हजारावर खेळाडुंचा सहभाग

 येवला : प्रतिनिधी
येवला तालुका शासकीय शालेय क्रिडा स्पर्धेत दहा खेळांच्या स्पर्धा येथील क्रिडा संकुलात संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये ३ हजार २७४ खेळाडूंनी सहभाग नोंदविला. फुटबॉल, कुस्ती, खो-खो, कराटे, क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, बुद्धीबळ आदींसह योगासन स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेचे आयोजन तालुका क्रिडा अधिकारी पल्लवी धात्रक, तालुका क्रिडा संयोजक नवनाथ उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. स्पर्धा यशस्वीतेसाठी शिरीष नांदुर्डीकर, सागर मुटेकर, सागर लोणारी, मंदार खैरे, स्वप्नील बाकळे, साहेबराव घुगे, शिवाजी साताळकर, विनोद निकम, धर्मराज शिरसाठ, शैलेज घाडगे, बाळू पैठणकर, शैलेश गायकवाड, दिलीप कचरे, राजेंद्र जाधव, किरण कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.


Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity