ताज्या घडामोडी :

.

.
Home » » सोनवणे महाविद्यालयात स्पर्धा परिक्षांचे मार्गदर्शन

सोनवणे महाविद्यालयात स्पर्धा परिक्षांचे मार्गदर्शन

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१८ | गुरुवार, सप्टेंबर ०६, २०१८

सोनवणे महाविद्यालयात स्पर्धा परिक्षांचे मार्गदर्शन 

अंदरसूल : मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे महाविद्यालयात गुरुवार दिनांक ६ सप्टेंबर रोजी स्टडी सर्कल अकॅडेमी येवला येथील टीम ने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन सरस्वती मातेच्या पूजनाने झाले  व त्यानंतर सहकार महर्षी गोविंदराव नाना सोनवणे यांच्या पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते हार अर्पण करण्यात आला.
या कार्यक्रमातून महाविद्यालयातील सर्व विद्यार्थांना स्पर्धा परीक्षांची  माहिती तसेच ओळख व्हावी हा हेतू होता त्यासाठी स्टडी सर्कल अकॅडेमी येवला येथील प्रेरणादायी मार्गदर्शक प्रा. श्री. व्ही.एस. पाटील उपस्थित होते त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून ग्रामीण भागातील विद्यार्थांना प्रेरित करताना म्हटले कि तुमच्यामध्ये सुद्धां भरारी घेणारा गरुड आहे त्याला ओळखा. यशाची शिखरे तुम्हाला खुणावत आहेत. आपल्यातील उर्जाचा वापर करा व त्या मार्गाने वाटचाल करा यश तुमचे आहे. तसेच मा.श्री. रामदास साबळे यांनीही महाविद्यालयातील सर्व विद्यार्थांना विविध स्पर्धाधांची माहिती दिली. व अभ्यास कसा करावा याबाबत मार्गदर्शन केले उपस्थित मान्यवरांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला तसेच कार्यक्रमाअंती विद्यार्थांनी त्यांना अभ्यासातील अडचणीबाबत तज्ञ मार्गदर्शकांशी चर्च्या केली.
या कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अरुण भांडगे सरचिटणीस सुभाषराव सोनवणे संचालक मकरंद सोनवणे अमोल सोनवणे रजवान नायर समता परिषद जिल्हा उपाध्यक्ष स्टडी सर्कल अकॅडेमी चे सचिन अहिरे योगेश कोथमिरे योगेश ढमाले मुलानी सर अक्षय शिंदे सागर पाठक प्राचार्य सचिन सोनवणे प्रिन्सिपल अल्ताफ खान सागर गाडेकर संदीप बोढरे अनिल कुलधर रवींद्र माकुने संतोष पैठणकर सुनिता पाटील कविता गायकवाड शालिनी वालतुरे सुनील सपकाळ शिवप्रसाद शिरसाट अक्षय खैरनार गणेश सोनवणे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संदीप बोढरे यांनी केले व आभार प्रा. अनिल कुळधर यांनी मानले.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity