ताज्या घडामोडी :

.

.
Home » » येवल्यातील शिवसृष्टीच्या मार्गातील अडथळे दुर शिवसृष्टी कृती समितीच्या बैठकीत रघुजीबाबा समाधीस्थळ विकासासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार…

येवल्यातील शिवसृष्टीच्या मार्गातील अडथळे दुर शिवसृष्टी कृती समितीच्या बैठकीत रघुजीबाबा समाधीस्थळ विकासासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार…

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, १२ सप्टेंबर, २०१८ | बुधवार, सप्टेंबर १२, २०१८

येवल्यातील शिवसृष्टीच्या मार्गातील अडथळे दुर

शिवसृष्टी कृती समितीच्या बैठकीत रघुजीबाबा समाधीस्थळ विकासासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार…

येवला – प्रतिनिधी

येवलेकरांचे स्वप्न असलेल्या शिवसृष्टीच्या मार्गातील अडथळे दुर झाले असून लवकरच शिवसृष्टी उभारण्याच्या कामाला गती मिळणार असल्याची माहिती शिवसृष्टी कृती समितीने रायगड या ॲडव्होकेट माणिकराव शिंदे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये दिली आहे. शिवसृष्टी कृति समितीची बैठक नुकतीच पार पडली त्यात समितीने ही माहिती दिली.      

रायगड ग्रुपचे ॲड. माणिकराव शिंदे, छावा मराठा संघटनेचे संजय सोमासे यांनी येवला शहरामध्ये भव्य अशी शिवसृष्टी उभारावी अशी मागणी २०१४ च्या निवडणुकामध्ये माजी उपमुख्यमंत्री ना. छगनराव भुजबळांकडे केली होती. ना.भुजबळांनी शनीपटांगणावर सन २०१४ च्या गाजलेल्या सभेमध्ये शिवसृष्टी साकारण्याचा शब्दही दिला होता. मात्र मध्यतंरीच्या अडचणीच्या काळात शिवसृष्टी पुन्हा मागे पडली होती. नुकतेच झालेल्या मराठा ठोक मोर्चा आंदोलनाच्यावेळी हा प्रश्न छावा संघटनेचे संजय सोमासे व मराठा समाजातील युवकांनी  पुन्हा उपस्थित केला होता. शिवसृष्टीसाठी आंदोलनाचे निवेदनही मराठा समाजाच्या वतीने प्रशासनाला दिले होते. मात्र शिवसृष्टीसाठी नामदार भुजबळांनी केलेल्या प्रयत्नाने कागदपत्राचे काम चालू असून प्रस्तावासाठी काही कागदोपत्री औपचारिकता असून ते लवकर मार्गी लावू तरी शांततेत आंदोलन करावे असे ॲड .माणिकराव शिंदे यांनी पोलिस ठाण्यात झालेल्या बैठकीत सुचवले होते. त्यावर ॲड. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली  संजय सोमासे, प्रा.नानासाहेब लहरे, अविनाश शिंदेपाटील यांनी तात्काळ शिवसृष्टी कृती समिती स्थापन करीत  सार्वजनिक बांधकाम खात्याकडे पाठपुरावा करीत प्रस्तावाची कागदपत्रे पाहून माहिती उपलब्ध केली. संबंधित जागा जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग करण्यासाठी प्रशासनाकडे पुन्हा पाठपुरावा करीत ते काम मार्गी लावले असून आमदार छगन भुजबळ व पालकमंत्री गिरिश महाजन यांच्याकडे कृती समिती पाठपुरावा करून पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे शिवसृष्टी उभी राहणेपर्यंत प्रयत्न करणार असल्याची माहिती समितीने दिली. तसेच या बैठकी मध्ये सर्वांना बरोबरबर घेऊन स्वराज्य उभारणाऱ्या शिवाजी महाराजांप्रमाणेच सर्व जातीधर्मातील लोक बरोबर घेऊन येवला शहराची स्थापना करणाऱ्या  राजेरघुजीबाबा यांच्या समाधीस्थळाच्या विकासासाठी हीच समिती पुढे काम करणार असल्याचेही बैठकीमध्ये ठरले  .

माजी उपमुख्यमंत्री छगनराव भुजबळांसह विधानपरिषदेचे माजी आमदार जयवंतराव जाधव यांच्या प्रयत्नाने या शिवसृष्टीसाठी प्रस्ताव मागणी केली गेली होती. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत संबंधित प्रस्तावही गेला होता. मात्र केवळ जागेच्या उताऱ्यावर नाव नसल्याने हा प्रस्ताव खोळबंल्याचे शिवसृष्टी कृती समितीच्या लक्षात आले. शिवसृष्टी कृती समितीने आमदार छगनराव भुजबळ, माजी आमदार जयवंतराव जाधव यांचे शिवसृष्टीसाठी केलेल्या प्रयत्ना बद्दल आभार मानले . ॲड. माणिकराव शिंदे यांच्या रायगड निवासस्थानी झालेल्या बैठकीमध्ये कृती समितीचा विस्तार करण्यात आला. यामध्ये समितीचे समन्वयक म्हणून संजय सोमासे, प्रा.नानासाहेब लहरे, अविनाश शिंदेपाटील, राष्ट्रवादीचे गटनेते नगरसेवक संकेत शिंदे, नगरसेवक प्रविण बनकर, नगरसेवक रुपेश दराडे, माजी आमदार मारोतराव पवार यांचे चिरंजीव शरद पवार, माजी नगराध्यक्ष भोलेनाथ लोणारी , स्वामी समर्थ सेवा मार्गाचे दत्तात्रेय जाधवसर, धिरजसिंह परदेशी , युवराज पाटोळे, सचिन अलगट, ,बबनराव साळवे, प्रशांत शिंदे, प्रदिप सोनवणे, पुरुषोत्तम रहाणे, डॉ.महेश्वर तगारे,सागर नाईकवाडे, सचिन सोनवणे यांना कृती समितीमध्ये सहभागी करून घेतले असल्याची माहिती समितीने दिली आहे.
Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity