ताज्या घडामोडी :

.

.
Home » » खरेदी विक्री संघाला १६ लाख ३५ हजार रुपये नफा येवला संघाची वार्षिक सर्वसाधारण सभेत चेअरमन दिनेश आव्हाड यांची माहिती

खरेदी विक्री संघाला १६ लाख ३५ हजार रुपये नफा येवला संघाची वार्षिक सर्वसाधारण सभेत चेअरमन दिनेश आव्हाड यांची माहिती

Written By अविनाश पुंडलिकराव पाटील शिंदे on बुधवार, १९ सप्टेंबर, २०१८ | बुधवार, सप्टेंबर १९, २०१८




खरेदी विक्री संघाला १६ लाख ३५ हजार रुपये नफा

येवला संघाची वार्षिक सर्वसाधारण सभेत चेअरमन दिनेश आव्हाड यांची माहिती                

येवला - प्रतिनिधी

तालूका खरेदी विक्री संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष दिनेश आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या हंगामात शेतकरी बांधवांनी आपला शेतमाल आधारभुत किंमत योजने अंर्तगत विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहन या प्रसंगी चेअरमन आव्हाड यांनी केले. संस्थेला १६ लाख ३५ हजार रुपये नफा झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन दिनेश आव्हाड यांनी यावेळी दिली. 

अध्यक्षपदाच्या काळात झालेले संस्थेचे कामकाज माजी चेअरमन भागुनाथ उशीर यांनी मनोगतातून व्यक्त केले. सन२०१७-१८ ला रासायनिक खतविक्रीमधून १५ लाख ४३ हजार ७४९ रुपये इतका नफा झाला असुन संस्थेचा सर्व खर्च वजा जाता ७ लाख ८६ हजार ९६ रुपये इतका निव्वळ नफा झाला असून आधारभूत किंमत योजनेअंर्तगत मार्केटिंग फेडरेशनकडून ८ लाख ४९ हजार रुपये येणे अपेक्षित असून यानुसार संस्थेला १६ लाख ३५ हजार रुपये नफा झाल्याची माहिती संस्थेचे चेअरमन दिनेश आव्हाड यांनी दिली.अहवाल सादर करुन रासायनिक औषध, किटकनाशक, महाबिज, एन.एस.सी.सी, नुझिविडू सिड्स,सिजेंटा इंडिया लि, ग्रीन गोल्ड सिड्स, जे.के. अॅग्रो सिड्स, सी.पी. सिड्स, पी.एचआय सिड्स, हायटेक सिड्स या नामवंत कंपन्यांचे बि बियाणांचे संस्थेचे दूकान लवकरच सुरू करणार असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

संस्थेचे जवळपास पंधराशे सभासद मयत असुन त्यांच्या वारसांनी आपली वारसनोंद संस्थेकडे करुन सभासद व्हावे अन्यथा मयत सभासदांचे सभासदत्व रद्द् करण्यात येईल असा ठराव संमत करण्यात येऊन अनेक दिवसापासुन संस्थेच्या रेकॉर्डला असलेले प्रलंबित येणे क्षमापित करण्याचाही ठराव या प्रसंगी झाला. अहवाल वाचन व्यवस्थापक बाबा जाधव व सुत्रसंचालन दत्तात्रय वैदय यांनी केले. याप्रसंगी नवनिर्वाचित चेअरमन दिनेश आव्हाड व व्हा.चेअरमन भागुजी महाले यांचा सत्कार राष्ट्रवादी कॉग्रेस जेष्ठनेते अॅड. माणिकराव शिंदे यांच्या हस्ते झाला तर भागुनाथ उशीर यांची महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघ सल्लागार समिती संचालकपदी निवड झाल्याबद्दल आमदार नरेंद्र दराडे, किशोर दराडे यांच्या हस्ते सत्कार झाला.

या सभेला व्हा.चेअरमन भागुजी महाले,संचालक भागुनाथ उशीर,राजेंद्र गायकवाड,जनार्दन खिल्लारे,शिवाजी धनगे, त्र्यंबक सोमासे, नाना शेळके, भास्कर येवले,दगडू टर्ले,संतोष लभडे,अनिल सोनवणे,दत्ता आहेर,आशाताई वैदय,जगन्नाथ बोराडे,सुरेश कदम,रघुनाथ पानसरे, मॅनेजर बाबा जाधव, नंदू भोरकडे, संतोष खकाळे,दामु पवार,सुदाम सोनवणे,रंगनाथ भोरकडे,एकनाथ वाघ,मच्छींद्र मढवई,आप्पासाहेब राजवाडे,बबनराव साळवे,अशोक आव्हाड,अशोक मुंढे,राजू परदेशी आदि उपस्थीत होते.

 

"येथील जेष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाने संघाचे कामकाज करून शेतकरी व संस्था हित लक्षात घेऊन योग्य निर्णय घेतले जातील. आमदारांच्या सहकार्याने विविध योजनांचा संघाला फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू."

दिनेश आव्हाड,चेअरमन,खरेदी विक्री सह.संघ येवला


Share this article :
मित्रानो ….
गेले सात वर्षांपासून आपल्या सेवेत असलेली व मागील काही कालावधीत तांत्रिक कारणाने अपडेट नसलेली येवला शहर व तालुक्यातील बातमीपत्रे इंटरनेटवर झळकवणारी वेबसाईट येवलान्यूज.कॉम (www.yeolanews.com) आता नियमीत अपडेट होत आहे.
येवला तालुक्यातील विविध संस्था , शाळा , व्यक्ती यांना आवाहन करण्यात येते कि आपल्याकडील बातमीचे फोटो, व्हिडीओ व टाईप केलेला मजकूर व्हॉटसअपवर 9370199666 किंवा 8308559666 यावर अवश्य पाठवावा.

ऑनलाईन दर्शक

 
Template Design by Creating Website Published by Siddhiyug Publicity